परभणीला जात असतांना शरद पवारांच्या ताफ्यातील गाडीला अपघात! रुग्णवाहिकेनं ब्रेक दाबला अन् गाड्या एकमेकांवर आदळल्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  परभणीला जात असतांना शरद पवारांच्या ताफ्यातील गाडीला अपघात! रुग्णवाहिकेनं ब्रेक दाबला अन् गाड्या एकमेकांवर आदळल्या

परभणीला जात असतांना शरद पवारांच्या ताफ्यातील गाडीला अपघात! रुग्णवाहिकेनं ब्रेक दाबला अन् गाड्या एकमेकांवर आदळल्या

Dec 22, 2024 08:02 AM IST

Sharad Pawar Convoy Car Accident: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात झाला आहे. ताफ्यातील गाड्या एकमेकांवर आदळल्याने हा अपघात झाला आहे. झाल्याची माहिती समोर आली आहे.

परभणीला जात असतांना शरद पवारांच्या ताफ्यातील गाडीला अपघात! रुग्णवाहिकेनं ब्रेक दाबला अन् गाड्या एकमेकांवर आदळल्या
परभणीला जात असतांना शरद पवारांच्या ताफ्यातील गाडीला अपघात! रुग्णवाहिकेनं ब्रेक दाबला अन् गाड्या एकमेकांवर आदळल्या

Sharad Pawar Convoy Car Accident : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख व ज्येष्ठ नेते शरद पवार हे बीड मधून परभणीला जात असतांना यांच्या ताफ्यातील गाडीला भीषण अपघात झाल्याची घटना शनिवारी रात्री घडली. शनिवारी शरद पवार हे बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग व परभणीच्या दौऱ्यावर होते. मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची शरद पवार यांनी भेट घेत त्यांचे सांत्वनापर केले. यानंतर शरद पवार हे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांच्या भेटीसाठी परभणीला जात होते. यावेळी त्यांच्या ताफ्यातील एका गाडीला हा अपघात झाला.

कसा झाला आपघात ?

शरड पवार यांनी मस्साजोग येथे सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. यानंतर ते परभणी येथे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या घरी जाण्यासाठी परभणीला निघाले होते. यावेळी शरद पवारांची कार पुढे गेल्यावर ताफ्यात असलेल्या रुग्णवाहिकेने अचानक ब्रेक दाबल्यामुळे रुग्णवाहिकेच्या मागे असणाऱ्या गाड्या एकमेकांवर आदळल्या. यात एका कारमध्ये शरद पवार गटाचे बीडचे आमदार संदीप क्षीरसागर बसले होते. या अपघातात सुदैवाने कुणीही जखमी वा कुणालाही दुखापत झाली नाही.

घटना कॅमेऱ्यात कैद

ही घटना एकाने कॅमेऱ्यात कैद केली आहे. अपघात गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पवार यांच्या ताफा हा परभणीला जात असतांना एकाने त्यांचा व्हिडिओ काढला. यावेळी अपघात झाल्याने तो मोबाइल कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हा व्हिडीओ समोर आला असून तो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

देशमुखांच्या कुटुंबाची भेटीनंतर शरद पवार काय म्हणाले?

सरपंच संतोष देशमुख यांच्या घरी भेट दिल्यावर शरद पवार म्हणाले, या घटनेने सर्वसामन्यांना मोठा धक्का बसला आहे. महाराष्ट्राच्या साखर उद्योगात बीड जिल्ह्याचा मोठा वाटा आहे. अशा जिल्ह्यात अशी घटना घडली. काहीच संबंध नसताना सरपंचाची हत्या झाली. ही अत्यंत गंभीर बाब असून राज्य आणि केंद्र सरकारने या घटनेची नोंद घ्यावी, असे शरद पवार हे देशमुखांच्या कुटुंबाची भेट घेतल्यानंतर म्हणाले.

काय आहे प्रकरण ?

बीडमधील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे ९ डिसेंबर २०२४ रोजी अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत चार जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विष्णू चाटे या आरोपीने जिल्ह्यात पवनचक्की लावणाऱ्या ऊर्जा कंपनीकडे दोन कोटी रुपयांची मागणी केली होती आणि मागण्या मान्य न झाल्यास काम बंद करण्याची धमकी दिली होती. संतोष देशमुख यांनी मध्यस्थी करून खंडणी थांबविण्याचा प्रयत्न केल्याने त्यांचे कारमधून अपहरण करून हत्या करण्यात आली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Whats_app_banner
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर