pratibha pawar stop at baramati textile park : बारामतीमधून धक्कादायक बातमी आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार व त्यांची नात रेवती सुळे यांना बारामतीतील टेक्सटाइल पार्कच्या बाहेरच अडवण्यात आलं आहे. त्यांना गेट समोरच अडवण्यात आल्याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. तब्बल अर्धा तास प्रतिभा पवार यांना आत जाण्यापासून रोखण्यात आलं आहे. यानंतर त्यांना आत सोडण्यात आलं आहे.
बारामती विधानसभा मतदार संघात काका विरुद्ध पुतण्या असा संघर्ष सुरू आहे. शरद पवार आणि अजित पवार यांच्यात मोठा संघर्ष पाहायला मिळत आहे. आता या संघर्षावरून नात्यांमध्ये मोठा दुरावा आल्याचं पुढ आलं आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार या नत रेवती सुळे यांच्या सोबत बारामती टेक्सटाईल पार्कमध्ये गेल्या होत्या. मात्र, तयांची गाडी बाहेरच अडविण्यात आली. आमची गाडी दिसताच सुरक्षारक्षकाने पार्कचे गेट बंद केले. आम्ही विचारपूस केली असता, आतमधून फोन आल्याने गेट बंद केले, असे सुरक्षारक्षकाने सांगितल्याचे, प्रतिभा पवार यांनी म्हटलं आहे. या कृतीमुळे प्रतिभा पवार या संतापल्या होत्या. आम्ही काय चोरी करण्यासाठी थोडीच आलोय. आम्ही तर शॉपिंग करण्यासाठी आलोय. आम्हाला का अडवले? असे म्हणत सुरक्षारक्षकाला प्रतिभा पवार यांनी खडसावले. बारामती टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार आहेत. या घटनेवरून अजित पवार आणि शरद पवार यांच्या नात्यात देखील आता दुरावा आल्याचं स्पष्ट झालं आहे.
प्रतिभा पवार व त्यांची नात रेवती सुळे यांना अडवल्याचा व्हिडिओ देखील पुढे आला आहे. प्रतिभा पवार या नात रेवती सुळे यांच्या सोबत शॉपिंग करण्यासाठी बारामती टेक्सटाईल पार्कमध्ये आल्या होत्या. मात्र, वॉचमॅनने त्यांची गाडी गेटसमोर अडवली. या बाबत सुरक्षारक्षकाला प्रतिभा पवार यांनी जाब विचारला असता वरून फोन आल्याचं उत्तर त्याने दिलं, आम्हाला वरुन फोन आला, त्यामुळं गेट लावलं असं त्यानं प्रतिभा पवार यांना सांगितलं. प्रतिभा पवार म्हणल्या, आमची गाडी आल्यावर गेट का बंद केलं? आम्ही चोरी करण्यासाठी आलेलो नाही, आम्हाला शॉपिंग करायची असून बॅगच्या शॉपमध्ये जायचं आहे.
दरम्यान, प्रतिभा पवार यांनी अनेक प्रश्न विचारल्यावर त्यांना आत सोडण्यात आलं. त्यांना बाहेर का अडवण्यात आलं याचं कारण समजू शकले नाही. या घटनेमुळे बारामतीत उलट सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.