शरद पवार शनिवारी साधणार ब्राम्हण संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद
पोलिसांचा चोख बंदोबस्त : राजकीय गोंधळ बघता यंत्रणा हाय अलर्टवर, सुरक्षेचे कारण देत या कार्यक्रमात पेन नेण्यास बंदी
पुणे : राज्यातील राजकीय गोंधळ दूर करण्यासाठी उद्या शनिवारी शरद पवार हे ब्राम्हण महासंघासोबतच २० ते २२ ब्राम्हंण संघटनाशी संवाद साधणार आहेत. राज्यातील सध्याची राजकीय परिस्थीती बघता या कार्यक्रमासाठी चोख बंदोबस्त ठेवला जाणार आहे. ही सभा पुण्यातील निसर्ग मंगल कार्यालयात सायंकाली ५ वाजता होणार आहे. पोलिसांनी सुरक्षेचे कारण देत या कार्यक्रमात पेन नेण्यास बंदी घातली आहे.
ट्रेंडिंग न्यूज
राज्यातील असलेले दुषित वातावरण निवळण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. तसे प्रयत्न केले जाणार आहेत. अखिल भारतीय ब्राम्हण महासंघ तसेच २० ते २२ संघटना यावेळी पवारांशी चर्चेसाठी येणार आहेत. सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि भाजपचे कार्र्यकर्ते यांच्यात वादंग सुरू आहे. नुकत्याच केंद्रीय मंत्री स्मृती इराणी या कार्यक्रमात आल्या होत्या.
यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी महागाईच्या मुद्यावरून या कार्यक्रमात गोंधळ घातला होता. दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांवर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. हे प्रकरण अजूनही निवळलेले नाही. त्या दरम्यान शरद पवार हे ब्राम्हण संघटनेच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमात कोणताही गोंधळ होऊ नये म्हणून बैठकीच्या ठिकाणी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला जाणार आहे.