मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  मनोज जरांगे यांनी उपोषण सुरू केल्यानंतरच त्यांना सांगितलं होतं की.. शिंदे-फडणवीसांच्या आरोपावर शरद पवार थेटच बोलले

मनोज जरांगे यांनी उपोषण सुरू केल्यानंतरच त्यांना सांगितलं होतं की.. शिंदे-फडणवीसांच्या आरोपावर शरद पवार थेटच बोलले

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Feb 27, 2024 08:43 PM IST

Sharad Pawar On Devendra Fadanvis : मनोज जरांगे यांना पाठबळ देण्यात येत असल्याच्या आरोपावर शरद पवार यांची प्रतिक्रिया दिली आहे. पवार म्हणाले की, जरांगे यांनी उपोषण सुरु केल्यानंतर मी त्यांची भेट घेतली होती. त्यांचा आणि माझा काडीचाही संबंध नाही.

Sharad pawar replied fadanvis over  secretly support   manoj jarange
Sharad pawar replied fadanvis over secretly support manoj jarange

मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीसांवर खालच्या पातळीवर येऊन आरोप केल्याने भाजप नेते व सरकारमधील मंत्रीही जरांगे यांचा उघड उघड विरोध करताना दिसत आहेत. मला संपवण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव असल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी केला होता. यावर फडणवीस यांनी मनोज जरांगे हे शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची स्क्रिप्ट बोलत असल्याचा आरोप केला होता. यावर आता शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. माझा आणि मनोज जरांगे यांचा काडीमात्र संबंध नाही, असं स्पष्टीकरण शरद पवार यांनी दिलं. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनोज जरांगे यांचे बोलविता धनी शरद पवार व  उद्धव ठाकरे हेच असल्याचा आरोप केला होता. यावर शरद पवारांनी जोरदार पलटवार केला आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या जबाबदारीच्या पदावर बसलेली लोकं इतकं पोरकट बोलतात, हे महाराष्ट्राच्या आतापर्यंतच्या इतिहासात कधीच पाहिले नव्हतं, असा टोला पवारांनी लगावला. मनोज जरांगे प्रकरणात जी काही एसआयटी चौकशी करायची आहे, ती करा. आमची काही हरकत नाही. आमचे आणि जरांगे पाटील यांचे फोन तपासा, असे शरद पवार यांनी म्हटले.

मनोज जरांगे यांनी उपोषण सुरु केल्यानंतर मी त्यांची भेट घेतली होती. त्यानंतर मनोज जरांगे यांच्याशी आजपर्यंत मी एकही शब्द बोललेलो नाही. आमची कोणतीही भेट झालेली नाही. 

जरांगे यांना भेटायला गेलो तेव्हा मी त्यांना म्हणालो होतो की, तुमच्या मागण्या आणि आग्रह मी समजू शकतो. दोन समाजांमध्ये अंतर वाढेल, असं काही करु नका.  राज्याच्या ऐक्याला बाधा येऊन असे वागू नका. त्यानंतर मनोज जरांगे यांच्याशी माझे एकाही शब्दाने बोलणे झालेले नाही.

सत्ताधाऱ्यांकडून राजेश टोपे यांच्यावर होत असलेल्या आरोपाबाबत पवार म्हणे की,  राजेश टोपे यांच्यावर लावण्यात येणारे आरोप चुकीचे आहेत. मुळात आंदोलनाचा प्रश्न सोडवण्यासाठी काही लोकांनी टोपे यांना मध्यस्थी करण्यास सांगितले होते. एकीकडे त्यांची मदत घ्यायची व दुसरीकडे त्यांच्यावर आरोप करायचे यामुळे सरकारवर कोण विश्वास ठेवणार?, असा सवाल शरद पवारांनी केला. 

आगामी लोकसभा निवडणुकीबाबत शरद पवार म्हणाले, 'सगळे राष्ट्रीय पक्ष लोकसभा कामाला लागले आहेत. मविआ सोबत आम्ही एकत्रित निवडणूक लढवणार आहोत. काही अजून पक्ष आहेत. आम्ही एकत्रित येऊन पर्याय देत आहोत. प्रकाश आंबेडकर यांनी पण आमच्या सोबत यावं असा आग्रह आहे. त्यांच्याशी बोलणं सुरू आहे. 

IPL_Entry_Point