मराठी बातम्या  /  Maharashtra  /  Sharad Pawar Resigns Rohit Pawar Baramati Agro Sugar Mill 4 Lakh Fine

Rohit Pawar : रोहित पवारांना धक्का; बारामती ॲग्रो कारखान्याला ठोठावला ४.५० लाखांचा दंड; 'हे' आहे कारण

Rohit Pawar
Rohit Pawar
Ninad Vijayrao Deshmukh • HT Marathi
May 04, 2023 02:55 PM IST

Resigns Rohit pawar baramati agro sugar mill fine : सरकारने कारखान्याचा गाळप हंगामाची तारीख जाहीर केली असतांना त्या आधीच गापळ जाहीर केल्याने रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो कारखान्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता कारखान्याला साडेचार लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

पुणे : सरकारने कारखान्याचा गाळप हंगामाची तारीख जाहीर केली असतांना त्या आधीच गापळ जाहीर केल्याने रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो कारखान्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता कारखान्याला साडेचार लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Pune IT Raid : मोठी बातमी! पुण्यात बांधकाम व्यावसायिकांवर प्राप्तीकर विभागाचे छापे

इंदापूर तालुक्यातील शेटफळगढे येथील बारामती ॲग्रो साखर कारखान्याने १५ ऑक्टोबर २०२२ पूर्वी गाळप हंगाम सुरू केल्याचा दावा भाजप नेते, विधान परिषदेचे आमदार राम शिंदे यांनी केला होता. यानंतर साखर आयुक्तालयांतर्गत विशेष लेखापरीक्षक यांच्यामार्फत या प्रकरणाच्या चौकशीचे निर्देश देण्यात आले होते.

Sangli Accident : सांगली विटा रस्त्यावर भरधाव कार ट्रॅव्हल्सला धडकली; एकाच कुटुंबातील ४ जण जागीच ठार

एकीकडे राज्याच्या राजकीय गोंधळ सुरू आहे. शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. या बाबत उद्या निर्णय होणार आहे. त्यात रोहित पवार यांना मोठा दणका बसला आहे. साखर कारखान्यांबाबत सरकारने गाळप हंगाम सुरू करण्याबाबत तारीख जाहीर केली होती.

ही तारीख सर्व कारखान्यांनी पाळणे गरजेचे असतांना रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो कारखान्याने या तारखेआधीच गाळप हंगाम सुरू केला होता. यावरून या पूर्वी रोहित बारामती ॲग्रोचे व्यवस्थापकीय संचालक सुभाष गुळवे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच दंडात्मक कारवाईचे आदेश देखील देण्यात आले होते. त्यानुसार पवार यांच्या कारखान्याला ४ लाख ५० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

WhatsApp channel