मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  लोकसभेला 'पिपाणी'मुळे ‘तुतारी’चा खेळ बिघडला, मात्र विधानसभेसाठी शरद पवारांची वेगळी चाल, निवडणूक आयोगाला लिहिलं पत्र

लोकसभेला 'पिपाणी'मुळे ‘तुतारी’चा खेळ बिघडला, मात्र विधानसभेसाठी शरद पवारांची वेगळी चाल, निवडणूक आयोगाला लिहिलं पत्र

Jun 24, 2024 05:22 PM IST

Sarad Pawar : लोकसभा निवडणुकीत पिपाणी चिन्हामुळे जो फटका बसला तो विधानसभेला बसू नये यासाठी राष्ट्रवादीकडून सावधगिरी बागळली जात आहे. यासाठी शरद पवारांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले आहे.

निवडणूक चिन्हाबाबत शरद पवारांचे आयोगाला पत्र
निवडणूक चिन्हाबाबत शरद पवारांचे आयोगाला पत्र

Tutari Pipani Confusion : नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात पिपाणी चिन्हामुळे 'तुतारी'चा आवाज दाबला गेल्याची चर्चा सुरू आहे. लोकांमध्ये पिपाणी व तुतारी वाजवणारा माणूस चिन्हाबद्दल संभ्रम होता. त्यातून पिपाणीला अधिक मते पडल्याचे राष्ट्रवादीकडून सांगतिले जात आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही साताऱ्यात पत्रकार परिषद घेत साताऱ्यात पिपाणीमुळं आपला उमेदवार पराभूत झाल्याचं म्हटलं होते. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील मतदानात तुतारी आणि पिपाणीमध्ये साम्य असल्याने लोकांमध्ये संभ्रम झाला आणि त्याचा फटका शरद पवार गटाच्या उमेदवारांना बसला.

पिपाणीला दीड लाख मतं पडली व साताऱ्यात पक्षाच्या उमेदवाराचा पराभव झाला. यापासून धडा घेत शरद पवार गट सतर्क झाला असून यासाठी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले आहे.

शरद पवारांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून विधानसभा निवडणुकीत पिपाणी चिन्ह वगळावे अशी मागणी केली आहे. अन्यथा सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

लोकसभेला राष्ट्रवादी शरद पवार गटाला तुतारी हे चिन्ह देण्यात आले होते. हे चिन्ह लोकांपर्यंत कमीतकमी काळात पोहोचणार नाही म्हणून पवार गट सर्वोच्च न्यायालयात गेला होता. तिथे राष्ट्रवादीचे चिन्ह घड्याळ परत मिळावे, अशी मागणी केली होती. परंतु सर्वोच्च न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावली होती. यानंतर लोकसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाने अनेक मतदारसंघांत पिपाणी हे चिन्ह अपक्षांना देत संभ्रम निर्माण केल्याचा आरोप पवार गटाने केला होता.

विधानसभेसाठी चिन्हवगळण्याची पवार गटाची मागणी -.

शरद पवारांनी निवडणुक आयोगाला पत्र लिहून निवडणुकीच्या फ्री सिम्बॉल मधून पिपाणी चिन्ह वगळण्याची विनंती केली आहे. लोकसभा निवडणुकीत पिपाणी चिन्हामुळे जो फटका बसला तो विधानसभेला बसू नये यासाठी राष्ट्रवादीकडून सावधगिरी बागळली जात आहे. निवडणूक आयोगाच्या फ्री सिम्बॉलमधून पिपाणी आणि तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हाचा समावेश असल्यामुळे अडचणी येतं असल्याचे म्हटले आहे.

चिन्हाच्या साधर्म्यामुळे शरद पवार गटाच्या दोन उमेदवारांचा पराभव झाला. त्यात रावेर मतदारसंघातून श्रीराम पाटील तर दुसरे साताऱ्यातून शशिकांत शिंदे यांना पराभवाचा सामना करावा लागला. साताऱ्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाचा उमेदवार ४५ हजार मतांनी पडला तर पिपाणीला ३७ हजार मतं मिळाली.

लोकसभेला शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाचं चिन्ह होतं तुतारी वाजवणारा माणूस तर दुसरीकडे अनेक ठिकाणी अपक्षाला टॅम्पेट म्हणजे पिपाणी हे चिन्ह देण्यात आलं होतं. या संभ्रमामुळे अनेक ठिकाणी पक्षाला कमी मतं मिळाली. साताऱ्यात पिपाणी चिन्हावर अपक्ष संजय गाडे यांना ३७०६२ मतं मिळाली. त्यामुळे तुतारी समजून मतदारांनी पिपाणीला मत दिल्याचं बोललं जात आहे.

 

लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाने १० पैकी ८ जागांवर विजय मिळवला. विजयी झालेल्या त्या जागांवरही पिपाणीमुळे थोडा प्रभाव पाहायला मिळाल्याचं बोललं जातंय. त्यामुळे विधानसभेत पिपाणी आणि तुतारीचा फटका शरद पवार गटाला बसू नये म्हणून पक्षात आत्तापासूनच हालचाली सुरु झाली आहे.

WhatsApp channel
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर