अजित पवार गटातील नेते छगन भुजबळ गेल्या काही दिवसांपासून पक्षात नाराज असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. लोकसभा निवडणुकीपाठोपाठ राज्यसभेवर जाण्याची संधीही हुकल्यामुळे भुजबळ नाराज झाल्याची चर्चा आहे. त्यानंतर ते ठाकरे गटात जाणार असल्याची चर्चा होती. मात्र शिवसेनेच्या वर्धापन दिन कार्यक्रमात संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले की, छगन भुजबळ आमच्या संपर्कात नाहीत. तसेच आम्हाला राज्यातील वातावरण बिघडवायचे नाही. त्यामुळे छगन भुजबळ आता शरद पवार गटात परतणार असल्याचे बोलले जात आहे. याबाबत विचारण्यात आल्यावर शरद पवार यांनी भुजबळांच्या परतीविषयी स्पष्टच सांगितलं.
भाजपाच्या ४०० पारचीघोषणा तसेच मी अजित पवारांसोबत नाही तर राष्ट्रवादी काँग्रेससोबत आहे, असे विधान केल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. त्यातच आताछगन भुजबळ हे पुन्हा एकदा शरद पवारांकडे परतणार असल्याची कुजबूज सुरू झाली आहे.याबाबत प्रश्न विचारल्यावरशरद पवारांना सूचक वक्तव्य केलं आहे.
तुमचे जुने सहकारी छगन भुजबळ नाराज असून त्यांच्याकडून परतीचे संकेत मिळत आहेत. याबाबत तुम्हाला काय वाटते, असा प्रश्न पवारांना विचारला गेल्यावर पवारांनी एका वाक्यात उत्तर दिले की, आम्हाला काही माहिती नाही.
मीअजित दादांबरोबर नाही तरराष्ट्रवादी बरोबर आहे या छगन भुजबळांच्या विधानाचा अर्थ काय घ्यायचा? छगन भुजबळांकडून परतीचे संकेत मिळत आहेत का? असा प्रश्न शरद पवार यांना विचारण्यात आला होता. यावर शरद पवार म्हणाले की, त्यांनी असे विधान का केलं, त्यांच्या या विधानाची पार्श्वभूमी माहिती नाही. माझी आणि त्यांची गेल्या ६ महिन्यामध्ये भेट झालेली नाही. त्यामुळे मला त्याबाबत काही माहिती नाही, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.
शरद पवार यांनी भाजपा तसेच पंतप्रधान मोदी यांच्यावर हल्लाबोल केला. भाजप आणि मोदी सरकारच्या विश्वासाला तडा बसला आहे. या निवडणूक निकालात दिसले की, आता मोदींच्या गॅरंटीवर लोकांचा विश्वासउरलेला नाही. जी आश्वासने दिली होती, ती पूर्ण केलेली नाही, या शब्दांत शरद पवार यांनी निशाणा साधला.
आमच्या सुप्रियालाही मोदींपेक्षा अधिक मताधिक्य आहे. देशाचे पंतप्रधान दीड लाख मतांनी निवडून आले आहेत. तर सुप्रिया सुळे १ लाख ५४ हजारांनी निवडून आल्या आहेत. देशाच्या पंतप्रधानांपेक्षा सुप्रिया सुळे जास्त मतांनी निवडून आल्या आहेत, अशी खोचक टिप्पणी शरद पवार यांनी केली आहे.
संबंधित बातम्या