NCP SP Protest Against EVM : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला आहे. निकाल येऊन तीन दिवस झाले तरी अद्याप महाविकास आघाडीच्या नेत्यांना हा पराभव पचवता आलेला नाही. दरम्यान, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. घरातील मतही जर उमेडवाराला मते मिळत नसतील तर नक्कीच काहीतरी गडबड आहे, असे आव्हाड म्हणाले.
संजय राऊत यांनी देखील सातत्याने ईव्हीएमवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले आहे. त्यांनी मतपत्रिकेद्वारे निवडणुका घ्याव्यात, अशी मागणी केली आहे. दरम्यान, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जितेंद्र आव्हाड यांनीही ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित केले आहेत. पराभवाचे कोणतेही एक कारण आम्ही स्वीकारू शकत नाही. इतकंच नाही तर लाडकी बहीण योजनेचा एवढा परिणाम होऊ शकतो, यावर माझा विश्वास नाही, असं आव्हाड म्हणाले. तसे ईव्हीएम विरोधात आंदोलन उभारू असे देखील आव्हाड म्हणाले.
आव्हाड म्हणाले, " लोकसभा निवडणुकीनंतर काहीच बदल झाला नव्हता. बेरोजगारी आणि महागाई वाढली होती. लाडकी बहीण योजनेचा फारसा परिणाम झाला असेल असे वाटत नाही. चंद्रपूरची जागा पाहिली तर आम्ही २ लाख ४० हजारांच्या फरकाने विजयी झालो. असे असतांना त्यावर आणखी १ लाख मते दिली गेली? हे असूच शकत नाही. विजयी आमदारांनी देखील आम्ही जिंकलो असलो तर कुठेतरी ईव्हीएममध्ये घोळ आहे हा मुद्दा उपस्थित केला आहे. ईव्हीएम विरोधात मोठ जाण आंदोलन होऊ शकतं अनेक गावात याची सुरुवात झाली आहे. ईव्हीएम विरोधात नागरिक बोलू लागले आहेत. तिथले लोक म्हणतात की जेव्हा आम्ही मतदान केले नसतांना मते दिली कशी केली ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
अनेक उमेदवारांना शून्य मतदान झाले आहे. त्यांच्या कुटुंबात ३२ मते आहेत. आता त्यांच्या घरच्यांनी देखील आपल्या उमेदवारांना मतदान केले नसेल हे नाही होऊ शकत. यापूर्वी संजय राऊत यांनी पुन्हा निवडणुका घ्याव्यात आणि मतपत्रिकेद्वारे मतदान व्हावे, अशी मागणी केली होती. 'ईव्हीएमबाबत सुमारे ४५० तक्रारी आमच्याकडे आल्या आहेत. वारंवार आक्षेप घेऊनही या प्रकरणांवर कोणतीही कारवाई झाली नाही. या निवडणुका निष्पक्ष पणे पार पडल्या असे कसे म्हणता येईल? त्यामुळे निकाल रद्द करून मतपत्रिकेद्वारे फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी माझी मागणी आहे, असे आव्हाड म्हणाले.
नाशिकमध्ये एका उमेदवाराला केवळ चार मते मिळाली. त्याच्या कुटुंबातील ६५ मते त्याला मिळणे अपेक्षित असतांना उमेदवाराला केवळ ४ मते कशी मिळाली ? असा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे. डोंबिवलीतील ईव्हीएमच्या मतमोजणीत त्रुटी आढळल्याने निवडणूक अधिकाऱ्यांनी आक्षेप घेण्यास नकार दिला. संजय राऊत यांनी उमेदवारांच्या दणदणीत विजयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. "त्यांनी असे कोणते क्रांतिकारी काम केले ज्यामुळे त्यांना दीड लाखाहून अधिक मते मिळाली? नुकतेच पक्ष बदललेले नेतेही आमदार झाले. त्यामुळे शंका उपस्थित होत आहे. शरद पवार यांनी पहिल्यांदाच ईव्हीएमवर शंका उपस्थित केली आहे, ज्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.