मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sharad Pawar : शरद पवारांचे कोल्हापुरातून शाहू महाराजांच्या उमेदवारीबाबत मोठं वक्तव्य, जागावाटपाचा फॉर्म्युलाही सांगितला

Sharad Pawar : शरद पवारांचे कोल्हापुरातून शाहू महाराजांच्या उमेदवारीबाबत मोठं वक्तव्य, जागावाटपाचा फॉर्म्युलाही सांगितला

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Feb 20, 2024 08:02 PM IST

Sharad Pawar meet Shahu Maharaj : शरद पवार यांनी कोल्हापुरातील न्यू पॅलेस येथे शाहू महाराज छत्रपती यांची भेट घेतली. त्यानंतर शाहू महाराजांच्या लोकसभा उमेदवारीबाबत मोठं वक्तव्य केलं.

Sharad Pawar meet Shahu Maharaj
Sharad Pawar meet Shahu Maharaj

Sharad PawarmeetShahu Chhatrapati : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. शहरात उभारलेल्या कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या स्मारकाचे उद्घाटन शरद पवारांच्या हस्ते पार पडले. त्यानंतर शरद पवार यांनी कोल्हापुरातील न्यू पॅलेस येथे शाहू महाराज छत्रपती यांची भेट घेतली. शाहू महाराजांना महाविकास आघाडीकडून कोल्हापूर लोकसभेच्या रिंगणात उतरवलं जाण्याची चर्चा सुरू असल्याने ही भेट महत्वाची मानली जात आहे. या भेटीनंतर शरद पवारांनी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात शाहू महाराजांच्या उमेदवारीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

शरद पवार म्हणाले की,महविकास आघाडीचे लोकसभेच्या ३९ जांगावर एकमत झालं आहे. लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर मतदारसंघातशाहू महाराज उमेदवार असतील तर मला आनंद होईल. शाहू महाराजांच्या उमेदवारी बाबत तिन्ही पक्षांशी चर्चा करून निर्णय घ्यावा लागेल. शाहू महाराज यांना राजकारणापेक्षा समाजकारणात जास्त रस आहे.कोल्हापूरकरांचा आग्रह असेल तर शाहू महाराजांच्या उमेदवारीबाबत मला आनंदच होईल. शाहू-आंबेडकर यांच्या विचारांशी ते सहमत आहेत. ते कोणत्याही राजकीय पक्षात सामील झालेलं पाहिलेलं नाही.

शरद पवार म्हणाले, महाविकास आघाडीकडून लोकसभेच्या ३९ जागांवर एकमत झालं आहे. दोन ते तीन जागांबद्दल खलबत्त सुरू आहेत मी सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरे एकत्र बसून या जागांबद्दल निर्णय घेऊ. भाजपने येत्या निवडणुकीत ४०० पारचा नारा दिला आहे. त्याचबरोबर राज्यातील ४० जागाही जिंकण्याचा दावा केला आहे. यावर पवारांनी खोचक टोला लगावताना म्हटले की, मला वाटतं ते खूप कमी आकडा सांगत आहेत.

महाविकास आघाडीकडून लोकसभेसाठी संभाजीराजे छत्रपती आणि शाहू महाराज छत्रपती यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर पवार म्हणाले की, अशी चर्चा माझ्या तर कानावर नाही आली. मी इतक्या वर्षांपासून इथं येतोय, पण माझ्या कानावर अशी चर्चा नाही. मात्र जर कोल्हापूरकरांचा आग्रह असेल अन् शाहू महाराज उमेदवार असतील तर मला आनंदच होईल.

 

शाहू छत्रपतींच्या उमेदवारीबद्दल निर्णय घेण्याचा अधिकार मला एकट्याला नाही. जागांबाबत निर्णय आम्ही चर्चा करून घेतो. मला याबाबत काँग्रेस महाविकास आघाडीच्या घटक पक्षांशी चर्चा करावी लागेल. तसंच माझ्या पक्षातील सहकाऱ्यांशीही चर्चा करून उमेदवाराबाबत निर्णय घ्यावा लागेल, असे पवार म्हणाले.

IPL_Entry_Point