बाबा आढाव यांच्या आत्मक्लेश आंदोलनाला शरद पवारांचा पाठिंबा; आंदोलनस्थळी जाऊन भेट घेत म्हणाले....
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  बाबा आढाव यांच्या आत्मक्लेश आंदोलनाला शरद पवारांचा पाठिंबा; आंदोलनस्थळी जाऊन भेट घेत म्हणाले....

बाबा आढाव यांच्या आत्मक्लेश आंदोलनाला शरद पवारांचा पाठिंबा; आंदोलनस्थळी जाऊन भेट घेत म्हणाले....

Nov 30, 2024 12:17 PM IST

Sharad Pawar: ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी ईव्हीएम विरोधात पुण्यात आत्मक्लेश आंदोलन सुरू केले आहे. आज सकाळी पहाटे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी त्यांची भेट घेऊन त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.

बाबा आढाव यांच्या आत्मक्लेश आंदोलनाला शरद पवारांचा पाठिंबा; आंदोलनस्थळी जाऊन भेट घेत म्हणाले....
बाबा आढाव यांच्या आत्मक्लेश आंदोलनाला शरद पवारांचा पाठिंबा; आंदोलनस्थळी जाऊन भेट घेत म्हणाले....

Sharad Pawar meet with Baba adhav: लोकशाहीची सुरू असलेली थट्टा व राज्यघटनेची सुरू असलेली चेष्टा याचा निषेध करण्यासाठी व्यक्त करण्यासाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डाॅ. बाबा आढाव यांनी गुरुवारपासून महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून महात्मा फुले वाडा येथे आत्मक्लेश उपोषण सुरू केलं आहे. आज त्यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे. आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी बाबा आढाव यांनी उपोषण स्थळी जाऊन भेट घेतली. तसेच त्यांच्या आंदोलनाला त्यांनी पाठिंबा देखील दिला. यावेळी शरद पवार यांनी नुकत्याच झालेल्या निवडणुकांबाबत भाष्य करत सत्तेचा व पैशाचा गैरवापर करत या निवडणुका झाल्या. या बाबी पूर्विबकाधी झाल्या नव्हत्या असे वक्तव्य केलं.

शरद पवार यांनी उपोषणस्थळी जात आधी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले स्मारकाला अभिवादन केलं. यांनतर त्यांनी बाबा आढाव यांच्याशी चर्चा केली. शरद पवार म्हणाले, बाबा हे आत्मक्लेश उपोषणाच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत. बाबांनी एकट्याने ही भूमिका घेणं योग्य नाही. लोकांनी पण उठाव केला पाहिजे.नाही तर देशातील लोकशाही धोक्यात येईल. देशाचे सूत्र ज्यांच्या हातात आहेत त्यांना त्याच्याशी काही घेणे देणे नाही. आज विरोधकांना बोलून दिलं जात नाही. दोन्ही सभागृहाचे विरोधी पक्ष आमचे म्हणणे मांडायला आम्हाला संमती द्या अशी मागणी करत असून त्यांची मागणी ल एकदाही मंजूर झालेली नाही. त्यामुळे आज लोकांना लोकांना जागृत करावं लागेल. ते जागरूक आहेत त्यांनी उठाव केला पाहिजे. सत्तेचा गैरवापर केला जात आहे. संपूर्ण राज्याच्या आणि देशाच्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावर पैसा आणि सत्तेचा गैरवापर महाराष्ट्रात बघायला मिळाला. त्यामुळे अस्वस्थता वाढली आहे.

बाबा आढाव यांनी घेतलेल्या निर्णयसारखे पाऊल सर्वांनी उचलणे गरजेचे आहे. त्यांच्या या उपोषणामुळे सामान्य लोकांना दिलासा मिळाला आहे. पण त्यांनी एकट्यानेच ही भूमिका घेणे हे योग्य नाही त्यांना जनतेची साथ हवी आहे,असं शरद पवार म्हणाले.

अधिवेशनात विरोधकांना बोलू दिलं जात नाही

राज्यात आणि देशात सुरू असलेल्या प्रकाराबाबत संसदेमध्ये विरोधी पक्षांना बोलू दिलं जातं नाही. सध्या सुरू असलेल्या अधिवेशनामध्ये सभागृहात आमचं म्हणणं मांडायला संमती द्या, अशी मागणी विरोधक करत आहेत. त्यामुळे आता लोकांना जागृत करावे लागेल असे पवार म्हणाले.

उद्धव ठाकरे आज घेणार बाबा आढाव यांची भेट

बाबा आढाव यांच्या आत्मक्लेश आंदोलनाला उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा दिला आहे आज दुपारी पुण्यात ते बाबा आढाव यांची भेट घेणार आहेत. महात्मा फुले वाडा येथे डॉ. बाबा आढाव आत्मक्लेश आंदोलन करत आहेत .

 

Whats_app_banner
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर