मराठी बातम्या  /  Maharashtra  /  Sharad Pawar May Differ But Jpc Must Be Formed Say Nana Patole On Adani Issue

Adani Group : शरद पवारांचे मत काहीही असो, अदानी घोटाळ्याची JPC चौकशी झालीच पाहिजे - नाना पटोले

नाना पटोले
नाना पटोले
Shrikant Ashok Londhe • HT Marathi
Apr 08, 2023 07:04 PM IST

Nana Patole on Adani issue : अदानी घोटाळ्यातील सत्य बाहेर येण्यासाठी जेपीसी चौकशी झालीच पाहिजे. अदानी घोटाळ्यावर शरद पवार यांचे वेगळे मत असले तरीही जेपीसी चौकशीवर काँग्रेस ठाम आहे, असे नाना पटोले यांन म्हटले आहे.

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे मत काहीही असो, अदानी घोटाळ्यातील सत्य बाहेर येण्यासाठी जेपीसी चौकशी झालीच पाहिजे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

नाना पटोले म्हणाले की, अदानी उद्योग समुहात शेल कंपन्यांच्या माध्यमातून आलेले २० हजार कोटी रुपये कुठून आले? व हा पैसा कोणाचा? हे जाणून घेण्याचा देशातील जनतेला अधिकार आहे. राहुल गांधी यांनी ही मागणी लावून धरली असून काँग्रेस पक्षासह देशातील विविध राजकीय पक्षांनी अदानी घोटाळ्याची चौकशी संयुक्त संसदीय समितीकडून व्हावी अशी मागणी केलेली आहे.

जेपीसीमध्ये सत्ताधारी पक्षाची सदस्य संख्या अधिक असली तरी अन्य पक्षाचे सदस्य सुद्धा या समितीत असतात. अदानी घोटाळ्याची सत्य परिस्थिती बाहेर आली पाहिजे, त्यासाठी जेपीसी गरजेची आहे. युपीए सरकारच्या काळात कोळसा घोटाळ्याचे आरोप झाल्यानंतर कोर्टाची समिती स्थापन करण्यात आली होती, तरीही विरोधकांच्या मागणीवरून संयुक्त संसदीय समितीची स्थापना करण्यात आली होती. अदानी घोटाळ्यावर शरद पवार यांचे वेगळे मत असले तरीही जेपीसी चौकशीवर काँग्रेस ठाम आहे.

 

अदानी समुहात एलआयसी, स्टेट बँक ऑफ इंडिया, पीएफचे पैसे मोदी सरकारने बेकायदेशीरपणे गुंतवण्यास भाग पाडले. हिंडनबर्गच्या अहवालाने अदानी समुहातील गैरव्यवहार उघड झाला आणि जनतेचा पैसा सुरक्षित आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. एवढा मोठा गंभीर प्रश्न असताना पंतप्रधान मोदी अदानी घोटाळ्यावर का बोलत नाहीत? घोटाळा नसेल तर घाबरण्याचे कारण काय? ‘कर नाही तर डर कशाला?’ असा सवालही नाना पटोले यांनी केला आहे.

WhatsApp channel