Sharad Pawar : साताऱ्यात शरद पवारांनी उडवली 'कॉलर'; उदयनराजेंना दिला स्पष्ट इशारा, पाहा VIDEO-sharad pawar in satara blew collar he also talked about udayanraje bhosle ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sharad Pawar : साताऱ्यात शरद पवारांनी उडवली 'कॉलर'; उदयनराजेंना दिला स्पष्ट इशारा, पाहा VIDEO

Sharad Pawar : साताऱ्यात शरद पवारांनी उडवली 'कॉलर'; उदयनराजेंना दिला स्पष्ट इशारा, पाहा VIDEO

Mar 29, 2024 05:53 PM IST

Sharad Pawar : सातारा दौऱ्यावर आलेल्या शरद पवारांनी स्वत:ची कॉलर उडवून उदयनराजेंना अप्रत्यक्षपणे इशारा दिला आहे. शरद पवारांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

साताऱ्यात शरद पवारांनी उडवली  'कॉलर'
साताऱ्यात शरद पवारांनी उडवली  'कॉलर'

आगमी लोकसभा निवडणुकीसाठी महायुती व महाविकास आघाडीकडून उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. मात्र सातारा मतदारसंघात अद्याप कोणीही उमेदवार जाहीर केला आहे. महायुतीच्या जागावाटपात रस्सीखेचमध्ये भाजपने अखेर सातारची जागा मिळवली असून येथून उदयनराजेंनी निवडणुकीत उतरवणे जवळपास निश्चित झाले आहे. आता महाआघाडी व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून उमेदवार कोण असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते शरद पवार आज सातारा दौरा केला. यावेळी पत्रकार परिषदेत पत्रकारांनी उदयनराजेंबद्दल विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी उत्तर दिले. त्यानंतर, पत्रकारांनी कॉलर उडवण्यासंदर्भात विचारले असता, शरद पवारांनी स्वत: कॉलर उडवून दाखवली.

उदयनराजेंची कॉलर उडवण्याची एक वेगळीच स्टाईल आहे. उदयनराजे पत्रकार परिषदांमध्ये तसेच जाहीर सभांमध्येही कॉलर उडवण्याची स्टाईल राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय असते. उदयनराजेंनी यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असतानाही अनेकदा कॉलर उडवून विरोधकांना इशारा दिला होता. विशेष म्हणजे एका कार्यक्रमात स्वत: शरद पवारांनी उदयनराजेंची कॉलर उडवली होती. आज सातारा दौऱ्यावर आलेल्या शरद पवारांनी स्वत:ची कॉलर उडवून उदयनराजेंना अप्रत्यक्षपणे इशारा दिला आहे. शरद पवारांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यामध्ये ते कॉलर उडवताना दिसत आहेत. शरद पवारांच्या या अंदाजाची सर्वत्र चर्चा रंगली आहे.

महायुतीने उदयनराजे यांच्या नावांची घोषणा केली नाही. त्यामुळे उदयनराजेंनी तुमच्याशी संपर्क केला का?, या प्रश्वावर शरद पवार म्हणाले की, नाही. त्यांनी संपर्क केलेला नाही.

२०१९ मध्ये उदयनराजे भोसले निवडून आले होते मात्र त्यांनी तीन महिन्यातच राजीनामा देऊन भाजपकडून पुन्हा मैदानात उतरले होते. मात्र राष्ट्रवादीचे श्रीनिवास पाटील यांनी पोटनिवडणुकीत त्यांना हरवलं होतं. मात्र यावेळी निवडणूक लढण्यास श्रीनिवास पाटील यांनी नकार दिल्याने नवा उमेदवार शोधावा लागत आहे. शरद पवार यांनी आज सातारा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी साताऱ्यात उमेदवार कोण असेल हे दोन दिवसात जाहीर करणार असल्याचं सांगितलं.

शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील, सुनिल माने, सत्यजित पाटणकर आदि नावांची चर्चा सुरू असल्याचे पवारांनी सांगितलं.