Samarjit Ghatge : तुम्ही समरजितसिंहराजेंना आमदार करा; मी त्यांना मंत्री करतो, कोल्हापुरात शरद पवारांनी कंडका पाडला-sharad pawar in kagal assured that samarjit ghatge will be a minister ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Samarjit Ghatge : तुम्ही समरजितसिंहराजेंना आमदार करा; मी त्यांना मंत्री करतो, कोल्हापुरात शरद पवारांनी कंडका पाडला

Samarjit Ghatge : तुम्ही समरजितसिंहराजेंना आमदार करा; मी त्यांना मंत्री करतो, कोल्हापुरात शरद पवारांनी कंडका पाडला

Sep 04, 2024 07:00 PM IST

Samarjit Ghatge Join NCP Sharad Pawar Group : तुमच्या सगळ्यांच्या पाठिंब्यावर समरजितसिंह राजेंनाविधानसभेत पाठवा त्यानंतर ते फक्तआमदार राहणार नाहीत तर त्यांना मंत्री करू, असाशब्द शरद पवारांनी कागलकरांना दिला.

समरजित घाटगेंना मंत्री करू, शरद पवारांचा शब्द
समरजित घाटगेंना मंत्री करू, शरद पवारांचा शब्द

Samarjit Ghatge Join NCP Sharad Pawar Group : शरद पवार कोल्हापूर दौऱ्यावर असून आज त्यांच्या उपस्थितीत समरजितसिंह घाटगे यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करा. या वेळी कागलच्या गैबी चौकात शरद पवारांनी उपस्थितांना संबोधित करताना हसन मुश्रीफांवर हल्ला चढवला. संकट आल्यावर पळून जाणे, लाचारी स्वीकारणे हा कागलचा इतिहास नाही. ज्यांनी लाचारी स्वीकारली त्यांना धडा शिकवल्याशिवाय जनता राहणार नाही. तुमच्या सगळ्यांच्या पाठिंब्यावर समरजितसिंह राजेंना विधानसभेत पाठवा त्यानंतर ते फक्तआमदार राहणार नाहीत तर त्यांना मंत्री करू, असा शब्द शरद पवारांनी कागलकरांना दिला.

शरद पवार म्हणाले की, आम्ही कागलमधील काही लोकांना साथ दिली, त्यांनामोठं केलं मात्र संकट काळात सोबत राहण्याऐवजी ते पळून गेले. त्यांचा आता हिशोब करायचा आहे. असं म्हणत शरद पवार यांनी कागलमध्ये मंत्री हसन मुश्रीफ यांची विधानसभेची वाट अवघड केली आहे. तसेच समरजित सिंहराजेंना मंत्री करण्याचं आश्वासनही जनतेला दिलं.

काही दिवसांपूर्वी भाजपला सोडचिठ्ठी दिलेले घाटगे राजघराण्याचे वंशज समरजितसिंहराजे घाटगे यांनी आज शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश करून कागलमधून विधानसभेची तुतारी फुंकली आहे. शरद पवारांच्या नेतृत्वात काम करणार असल्याचे समरजित घाटगे यांनी स्पष्ट करत हसन मुश्रीफांसमोर शड्डू ठोकला आहे.

शरद पवार पुढे म्हणाले की, समरजित घाटगे यांच्यासाठीमोठ्या संख्येने तुम्ही उपस्थित राहिलात. गैबी चौकात याआधीही अनेक सभा झाल्या आहेत. मात्र आजच्या सारखी गर्दी कधी पाहिली नाही. याचा अर्थ परिवर्तनाचा निर्णय जो समरजित घाटगे यांनी घेतला तो योग्य आहे.

भाजपची साथ का सोडली? समरजितसिंह घाटगेंनी सांगितलं कारण –

कागलमध्ये आज पाऊस असूनही आजच्या कार्यक्रमला मोठी गर्दी झाली. आजच्या सभेतील गर्दीने नवा रेकॉर्ड केला आहे. कागलच्या भविष्यासाठी पक्ष बदलला, कुणाला पाडण्यापेक्षा जनतेच्या कल्याणासाठी पक्ष बदलण्याचा निर्णय घेतला, असं समरजित सिंह घाटगे यांनी म्हटलं.

 

गेल्या ८ वर्षापासून पक्षात प्रामाणिकपणे काम केलं आता शरद पवार आदेश देतील ते काम करू. तसंच पवारांच्या नेतृत्वात कागलमध्ये १०० टक्के बदल घडवू, असा विश्वासही समरजित सिंह घाटगे यांनी व्यक्त केला आहे. शरद पवारांच्या पक्षात अजून अनेक प्रवेश होणार असल्याचा दावाही घाटगे यांनी केला आहे.