Sharad Pawar : शरद पवारांची तब्येत बिघडली, पुढील चार दिवसांचे सर्व नियोजित कार्यक्रम, दौरे अचानक रद्द
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sharad Pawar : शरद पवारांची तब्येत बिघडली, पुढील चार दिवसांचे सर्व नियोजित कार्यक्रम, दौरे अचानक रद्द

Sharad Pawar : शरद पवारांची तब्येत बिघडली, पुढील चार दिवसांचे सर्व नियोजित कार्यक्रम, दौरे अचानक रद्द

Jan 25, 2025 04:53 PM IST

SharadPawarNews : शरद पवारांना कफ झाल्याने बोलताना त्रास होत आहे. यामुळे त्यांना कार्यक्रमांमध्ये भाषण करण्यास त्रास होत आहे. या कारणाने त्यांचे पुढील चार दिवसांचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले असल्याचे, शरद पवार गटाकडून सांगण्यात येत आहे.

शरद पवारांची तब्येत बिघडली
शरद पवारांची तब्येत बिघडली

Sharad Pawar Health : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती अचानक बिघडली आहे. शरद पवार यांना बोलताना त्रास होत असल्यामुळे त्यांनी आपले पुढचे चार दिवसांचे सर्व दौरे व नियोजित कार्यक्रम रद्द केले आहेत. शरद पवार सध्या पुण्यात आहेत. याबाबतची माहिती राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाने दिली आहे.

शरद पवारांना कफ झाल्याने बोलताना त्रास होत आहे. यामुळे त्यांना कार्यक्रमांमध्ये भाषण करण्यास त्रास होत आहे. या कारणाने त्यांचे पुढील चार दिवसांचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले असल्याचे, शरद पवार गटाकडून सांगण्यात येत आहे. शरद पवार गेल्या दोन दिवसांपासून सांगली, कोल्हापूरच्या दौऱ्यावर होते. तेथील कार्यक्रम, सभांमध्ये बोलताना त्यांना त्रास होत असल्याने डॉक्टरांनी त्यांना आरामाचा सल्ला दिल्याचे समजते.

गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात आपल्या दौऱ्यांमुळे सक्रिय असलेले शरद पवार यांची प्रकृती खालावल्याने चाहत्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

प्रकृती अस्वस्थ असूनही शरद पवार यांनी आपल्या लढाऊ बाण्याचा परिचय संपूर्ण महाराष्ट्राला दिला आहे. विधानसभेतील अपयशानंतरही त्यांनी राज्यभर दौरे करत महायुती सरकारवर हल्लाबोल केला आहे. त्यांचे दौरे पक्षासाठी नवी ऊर्जा देणारे ठरत आहेत. मात्र, प्रकृती खालावल्यानंतर त्यांना पुढील काही दिवस विश्रांती घ्यावी लागणार आहे.

पवारांनाआपत्ती व्यवस्थापन महायोद्धा पुरस्कार -

शुक्रवारी (२४ जनेवारी) रोजीकोल्हापुरातील व्हाईट आर्मी व शिवाजी विद्यापीठाच्या शिव-सहाय्यता आपत्ती व्यवस्थापन केंद्राच्या वतीने शरद पवार यांना आपत्ती व्यवस्थापन महायोद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. खासदार शाहू छत्रपती यांच्या हस्तेत्यांना पुरस्कार देण्यात आला.लातूर भूकंपावेळी शासकीय अधिकाऱ्यांनी, काही स्वयंसेवी संस्थांनी उत्कृष्ट काम केले. आपत्तीच्या काळात महाराष्ट्रातील शासकीय यंत्रणा चांगले काम करते, असा अनुभव आहे. त्यामुळे त्यांना बळ देण्याची आपणा सर्वांची जबाबदारीअसल्याचे पवार यावेळी म्हणाले.

सेवानिवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांचे निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

कच्छ, भूज भूकंपावेळी अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान होते. त्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवून यातून मार्ग काढण्याची विनंती केली. यावेळी सर्वांनीच माझे नाव पुढे केल्याने या भूकंपावेळी मी आपत्ती व्यवस्थापनात पुढाकार घेतला. केंद्रात मंत्री असताना मी व तत्कालीन सचिव पी.के. मिश्रा कॅलिफोर्नियासह तीन-चार देशात गेलो, तेथील आपत्ती व्यवस्थापनाच्या यंत्रणा पाहिल्या अन् त्यातूनच आपल्या देशात पहिल्यांदा आपत्ती व्यवस्थापन कायदा तयार झाल्याचे पवार म्हणाले.

या कार्यक्रमात खासदार शाहू छत्रपती म्हणाले, भूज येथील भूकंपावेळी पवार यांनी महाराष्ट्र पॅटर्न वापरून सर्वसामान्यांना दिलासा देण्याचे काम केले.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर