मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  NCP: शरद पवार म्हणजेच पक्ष, साहेब जिथे उभे राहतील, तिथे पक्ष उभा राहील; जयंत पाटलांची प्रतिक्रिया

NCP: शरद पवार म्हणजेच पक्ष, साहेब जिथे उभे राहतील, तिथे पक्ष उभा राहील; जयंत पाटलांची प्रतिक्रिया

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Feb 06, 2024 09:14 PM IST

NCP Name and Symbol: निवडणूक आयोगाच्या निकालानुसार, अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नवे अध्यक्ष असतील.

Sharad Pawar and Jayant patil
Sharad Pawar and Jayant patil

Jayant Patil: निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्षाचे नाव आणि चिन्ह अजित पवार गटाला दिल्याने शरद पवार यांच्या गटाला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णायाचे स्वागत केले आहे. तर, शरद पवार गटातील जेष्ठ नेते जयंत पाटील यांनी हा निर्णय धक्कादायक असल्याचे म्हटले आहे. याशिवाय, शरद पवार हेच पक्ष आहेत. शरद पवार जिथे उभा राहतील, तिथे पक्ष उभा राहिल, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली.

"निवडणूक आयोगाचा हा निर्णय धक्कादायक आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद पवार यांच्या हातातून पक्ष हिसकावून घेतला जातोय. देशातील जवळपास सर्वच संविधानिक संस्थांनी स्वायत्तता गमावली असल्याने तर्कहीन निर्णय देऊन तांत्रिक कारणे पुढे केली गेलेली सकृतदर्शनी दिसत आहे. या निकालाचा सविस्तर अभ्यास करुन आम्ही त्यावर भाष्य करू. या निकालाला आम्ही सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असून देशाचे सर्वोच्च न्यायालय आम्हाला न्याय देईल याची आम्हाला खात्री आहे", असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

नागालँड- ७ आमदार

झारखंड- १ आमदार

लोकसभा खासदार- २

महाराष्ट्र विधानपरिषद- ५

राज्यसभा- १

 

शरद पवारांसोबत किती आमदार?

महाराष्ट्र- १५ आमदार

केरळ- १ आमदार

लोकसभा खासदार- ४

महाराष्ट्र विधानपरिषद- ४

राज्यसभा – ३

निवडणूक आयोगाच्या निकालानुसार, अजित पवार आता राष्ट्रवादी पक्षाचे नवे अध्यक्ष असतील. निवडणूक आयोगाला नाव आणि चिन्ह देऊपर्यंत शरद पवारांचा पक्ष अपक्ष म्हणून राहणार आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शरद पवारांची पुढची भूमिका काय असणार? याकडे राज्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.

WhatsApp channel