Sharad Pawar : संभाजी भिडे वगैरे काही बोलणाच्या लायकीची माणसं आहेत का? प्रश्न विचारताच भडकले शरद पवार-sharad pawar get angry over question about sambhaji bhide statement on maratha reservation ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sharad Pawar : संभाजी भिडे वगैरे काही बोलणाच्या लायकीची माणसं आहेत का? प्रश्न विचारताच भडकले शरद पवार

Sharad Pawar : संभाजी भिडे वगैरे काही बोलणाच्या लायकीची माणसं आहेत का? प्रश्न विचारताच भडकले शरद पवार

Aug 19, 2024 04:41 PM IST

Sharad Pawar on Sambhaji Bhide : मराठ्यांनी आरक्षण का मागावं? मराठ्यांना देश चालवायचा आहे, मराठा ही देशाचा संसार चालवणारी जात आहे, असं वक्तव्य संभाजी भिडे यांनी केलं होतं. यावर शरद पवारांनी प्रतिक्रिया देणं टाळलं आहे.

भिडे यांच्याबाबतच्या प्रश्नावर भडकले शरद पवार
भिडे यांच्याबाबतच्या प्रश्नावर भडकले शरद पवार

राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला असतानाच संभाजी भिडे यांनी केलेल्या वक्तव्याने वातावरण तापलं आहे. मराठ्यांना आरक्षण कशाला पाहिजे, असे वक्तव्य संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी केलं होतं. त्यावर संभाजी भिडे काही बोलण्याच्या लायकीचे व्यक्ती आहेत का, असा उलट सवाल शरद पवार (Sharad pawar) यांनी प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराला केला. त्याचबरोबर ‘लाडकी बहीण’ योजनेमुळे विधानसभा निवडणूक लांबणीवर पडल्याचीचर्चा आहे. याबाबत आता राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया उमटत असतानाच शरद पवारांनीही यावरून सरकारलाकानपिचक्या दिल्या आहेत.

एका कार्यक्रमात बोलताना संभाजी भिडे यांनी मराठा आरक्षणावर प्रतिक्रिया दिली होती. राज्यात आरक्षणाचा मुद्दा कळीचा बनला आहे. मराठ्यांनी आरक्षण का मागावं? मराठ्यांना देश चालवायचा आहे, मराठा ही देशाचा संसार चालवणारी जात आहे, मराठे सिंह आहेत, त्यांनी आपलं जंगल राखावं,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्याचा जीवन गाडा हाकत आहेत. महाराष्ट्रात दररोज नवनवीन समस्यांची पालवी फुटत असते. त्यावर रामबाण उपाय करण्याचे काम शासनपार पाडत आहे. चांगले पार पाडत आहेत, असे संभाजी भिडेम्हणाले होते.असंवक्तव्य संभाजीभिडे यांनीकेलं होतं.त्यावरबोलतानाशरदपवारांनीहीप्रतिक्रियादिली.

पत्रकारांनी संभाजी भिडेंच्या मराठा आरक्षणावरील भूमिकेबाबत शरद पवारांना सवाल केल्यानंतर त्यांनी यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. माध्यम प्रतिनिधींनी संभाजी भिडे यांच्याबाबत प्रश्न विचारायला सुरुवात केली. मात्र प्रश्न पूर्ण होण्याच्या आताच पवारांनी नाराजी व्यक्त करत संभाजी भिडे वगैरे कॉमेंट्स करायच्या लायकीची माणसे आहेत का? काहीही प्रश्न विचारता का? त्यामुळेच मी तुम्हाला भेटायचे नाही म्हणत होतो. काहीही विचारता, एकंदर आपल्या लोकांचा दर्जा फार उतरलेला आहे. संभाजी भिडे आणि अमुक-तमुक, असे म्हणत शरद पवार यांनी पत्रकार परिषद संपवली.

..तर मी राजीनामा देईन आणि राजकारणातून सन्यास घेईल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मराठा आरक्षण द्यायचं आहे, त्यांना सगेसोयऱ्यांच्या मुद्दा मान्य आहे. पण देवेंद्र फडणवीस यांचा त्यांना विरोध असल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी केला होता. त्यावर असं काही सिद्ध झाल्यास आपण राजीनामा देऊ आणि राजकारणातून निवृत्त होऊ असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं.

आतापर्यंत मराठा समाजासाठी मी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्णय घेतले आहेत आणि मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी राहिलो आहे. जाणीवपूर्वक आरोप केले जात असल्याचे फडणवीस म्हणाले.