NCP Politics : शरद पवारांच्या पक्षाला मिळालं नवं नाव; निवडणूक आयोगानं काही वेळातच दिला निर्णय-sharad pawar faction gets new name from election commission of india ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  NCP Politics : शरद पवारांच्या पक्षाला मिळालं नवं नाव; निवडणूक आयोगानं काही वेळातच दिला निर्णय

NCP Politics : शरद पवारांच्या पक्षाला मिळालं नवं नाव; निवडणूक आयोगानं काही वेळातच दिला निर्णय

Feb 07, 2024 06:51 PM IST

Nationalist Congress Party : राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष अजित पवार यांच्या गटाकडं गेल्यानंतर शरद पवारांच्या नेतृत्वाखालील पक्षाला आता नवी ओळख मिळाली आहे.

Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar
Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar (Sandip Mahankal)

Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष निवडणूक आयोगानं अजित पवार यांच्या गटाला दिल्यानंतर आता शरद पवार गटाला नवं नाव देण्यात आलं आहे. 'नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार' असं हे नाव आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर अजित पवार यांच्या गटानं मूळ पक्षावर व पक्षाच्या चिन्हावर दावा केला होता. निवडणूक आयोगाकडं यावर सुनावणी होऊन आयोगानं अजित पवार यांच्या बाजूनं निकाल दिला होता. तसंच, राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटानं नवीन नावासाठी पर्याय सुचवावेत, असे निर्देश निवडणूक आयोगानं दिले होते.

निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, शरद पवार गटानं तीन पर्याय सुचवले होते. त्यातील 'राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार' हे नाव निवडणूक आयोगानं मान्य केलं आहे. त्यामुळं राज्यसभा निवडणुकीला ठोस नावानिशी सामोरं जाण्याचा मार्ग त्यांना मोकळा झाला आहे.

प्रफुल्ल पटेल म्हणतात…

निवडणूक आयोगाच्या निर्णयावर अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी प्रतिक्रिया दिली. 'शरद पवारांच्या पक्षाला मिळालेलं नाव हे राज्यसभा निवडणुकीपुरतं मर्यादित आहे. निवडणूक झाल्यानंतर त्यांना पुन्हा पक्षाच्या नावासाठी अर्ज करावा लागणार आहे. निवडणूक आयोगाची ऑर्डर नीट वाचली नसल्यानं काहींचा गैरसमज झाला आहे, असं प्रफुल्ल पटेल म्हणाले.

जितेंद्र आव्हाड यांचं उत्तर

प्रफुल्ल पटेल यांच्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. ‘निवडणूक आयोगाची ऑर्डर फक्त प्रफुल्ल पटेल यांनाच कळते. आम्हाला इंग्रजी येत नाही,’ असा टोला आव्हाड यांनी हाणला. शेवटी चोरांनी घड्याळ चोरून नेलंय. मनगट आमच्याकडंच आहे,' असंही आव्हाड म्हणाले.

Whats_app_banner
विभाग