मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sharad Pawar: मराठवाडा विद्यापीठाची डी-लिटची पदवी स्वीकारताना शरद पवार भावूक, म्हणाले...

Sharad Pawar: मराठवाडा विद्यापीठाची डी-लिटची पदवी स्वीकारताना शरद पवार भावूक, म्हणाले...

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Nov 19, 2022 02:03 PM IST

Sharad Pawar In BAMU : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठानं राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा डी-लिट ही पदवी देऊन गौरव केला आहे.

Sharad Pawar
Sharad Pawar

Sharad Pawar In BAMU Aurangabad : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठानं राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना डी-लिट ही पदवी दिली आहे. राज्यातील दोन बड्या नेत्यांचा मराठवाडा विद्यापीठानं सन्मान केल्यानं दोन्ही नेते एकाच व्यासपीठावर आल्याचं पाहायला मिळालं. यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल आणि विद्यापीठाचे कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी शरद पवार आणि नितीन गडकरी यांना डी-लिट ही पदवी प्रदान केली. त्यानंतर उपस्थितांशी बोलताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार भावूक झाल्याचं पाहायला मिळालं.

पदवीप्रदान करताना जेव्हा शरद पवार यांच्या योगदानाचा एका माहितीपटाच्या माध्यामातून आढावा घेतला जात होता, त्यात विद्यापीठाच्या नामांतराचा लढा आणि त्यावेळच्या राजकीय संघर्षाचा उल्लेख येताच शरद पवार भावूक झाले. यावेळी संपूर्ण सभागृहात लोक स्तब्ध झाले होते. याशिवाय डी-लिट पदवी स्वीकारल्यानंतर शरद पवारांनी मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराच्या राजकीय घडामोडींना उजाळा दिला.

यावेळी उपस्थितांशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे राज्यातील एक ऐतिहासिक विद्यापीठ आहे. मला अजूनही विद्यापीठाच्या निर्मितीचा काळ आठवतो. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा या विद्यापीठाच्या निर्मितीशी संबंध होता, असं म्हणत शरद पवार यांनी विद्यापीठाच्या स्थापनावेळच्या राजकीय घडामोडी सांगितल्या.

मराठवाड्यात कोणत्याही शैक्षणिक सुविधा नसल्यामुळं बाबासाहेब आंबेडकर औरंगाबादेत आले, त्यांनी मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली. त्यांचं शैक्षणिक क्षेत्राच्या विकासात मोठं योगदान आहे, असं म्हणत शरद पवारांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला उजाळा दिला.

IPL_Entry_Point

विभाग