Sharad Pawar : मराठा-ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर शरद पवारांनी केली भूमिका स्पष्ट; म्हणाले पावसाळी अधिवेशन संपताच..
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sharad Pawar : मराठा-ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर शरद पवारांनी केली भूमिका स्पष्ट; म्हणाले पावसाळी अधिवेशन संपताच..

Sharad Pawar : मराठा-ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर शरद पवारांनी केली भूमिका स्पष्ट; म्हणाले पावसाळी अधिवेशन संपताच..

Jul 27, 2024 03:04 PM IST

Sharad Pawar on Maratha Resrvation : शरद पवारयांनी मराठा-ओबीसी आरक्षणााबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. दोन्ही समुदायामध्येसामंजस्य कसं करता येईल यावर अधिक लक्ष देणं गरजेचं असून संवाद आवश्यक असल्याचे म्हटले आहे.

मराठा आरक्षणावर पवारांनी केली भूमिका स्पष्ट
मराठा आरक्षणावर पवारांनी केली भूमिका स्पष्ट

Sharad Pawar on Maratha OBC Resrvation : राज्यात मराठा व ओबीसी समाज आरक्षणाच्या मुद्द्यावरून एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. यामुळे राजकीय वातावरणही चांगलंच तापलं आहे. मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन त्यांना ओबीसीमधूनच आरक्षण देण्याची मागणी मनोज जरांगे यांनी लावून धरली आहे. तर ओबीसी नेत्यांनी (OBC Reservation) याला विरोध करत मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण न देता स्वतंत्र आरक्षण देण्याची मागणी केली आहे. या मुद्यावरून समाजासह राजकारणातही दोन गट पडले असून राज्यात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान यावर शरद पवार (Sharad Pawar) यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. दोन्ही समुदायामध्ये सामंजस्य कसं करता येईल यावर अधिक लक्ष देणं गरजेचं असून संवाद आवश्यक असल्याचे म्हटले आहे.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना शरद पवार म्हणाले की, आरक्षणाच्या मुद्द्यावरून (Maratha Reservation) राज्यातील जालना व बीड जिल्ह्यात प्रचंड तणाव आहे. संसदेचं पावसाळी अधिवेशन संपल्यावर मी शांतपणे जाऊन तिथल्या लोकांशी संवाद साधणार आहे. तिथे कटुता, अविश्वासाचं चित्र दिसतंय आणि हे भयावह आहे. गावागावातून तेढ निर्माण झाली असून एका समाजाच्या व्यक्तीचे हॉटेल असेल तर दुसऱ्या समाजातील लोक चहा घ्यायलाही जात नाहीत. असे वातावरण मी महाराष्ट्रात कधीच ऐकलं नाही. हेकाहीही करून बदलायला हवं. लोकांमध्ये विश्वास वाढवयाला हवा. यासाठीसंवादम्हत्वाचा आहे. आमच्यासारख्या लोकांनी यासाठी जीव ओतून काम केलं पाहिजे, यात अधिक लक्ष द्यायला हवं, असं शरद पवार म्हणाले.

मराठा व ओबीसी आरक्षणावरून राज्यात दोन गट पडले आहे. त्यांना कोणीतरी भडकवत आहे. दुदैवाने आजच्या राज्यकर्त्यांनीही दोन वेगळ्या बाजू घेतल्या आहेत. राज्यकर्तेही ओबीसी व मराठा समाजात विभागला गेला आहे. हे योग्य नाही, आपण सामंजस्य कसं निर्माण करू शकू यावर अधिक लक्ष देणं गरजेचं आहे.

आजच्या काळात संवादाला खूप महत्व आहे. संवाद ठेवायला पाहिजे. मात्र आज संवाद संपलेला दिसत आहे. सार्वजनिक जीवनात जेव्हा संवाद थांबतो तेव्हा चुकीच्या समजुती, गैरप्रकार वाढतात. त्यामुळे संवाद गरजेचा आहे.

आरक्षणाच्या मुद्द्यावर केंद्र सरकारने लक्ष घातले का, या प्रश्नावर शरद पवार म्हणाले की,केंद्र सरकारने या प्रकरणात अजिबत लक्ष घातलेलं दिसत नाही. आरक्षणाच्या मुद्द्यावर केंद्र सरकार आपली भूमिका बजावत नसल्याचं पवार म्हणाले.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर