Sharad Pawar Birthday : अजित पवारांनी काकांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा; ट्वीट करून म्हणाले…
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sharad Pawar Birthday : अजित पवारांनी काकांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा; ट्वीट करून म्हणाले…

Sharad Pawar Birthday : अजित पवारांनी काकांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा; ट्वीट करून म्हणाले…

Dec 12, 2024 11:41 AM IST

Ajit Pawar wishes Sharad Pawar : ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ट्वीटच्या माध्यमातून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

अजित पवारांनी काकांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, ट्विटमध्ये नेमकं काय?
अजित पवारांनी काकांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, ट्विटमध्ये नेमकं काय?

NCP-SP Chief Sharad Pawar Birthday : राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा आज वाढदिवस आहे. त्या निमित्तानं देशभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. राजकीय अपरिहार्यतेतून शरद पवार यांच्यापासून फारकत घेणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील काकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

अजित पवार यांनी शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणारं ट्वीट केलं आहे. त्यांनी काका शरद पवार यांचा फोटो ट्वीट केला आहे. आदरणीय श्री. शरद पवार साहेबांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपणांस उत्तम स्वास्थ्य व दीर्घायुष्य लाभो, ही सदिच्छा, असं त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

अजित पवारांनी नेत्यांसह घेतली भेट

संसद अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार हे सध्या दिल्लीत आहेत. तिथं एक छोटेखानी कार्यक्रम होणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत चर्चा करण्यासाठी अजित पवार हे देखील आज दिल्लीत आहेत. वाढदिवसाच्या निमित्तानं अजित पवार यांनी प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ आणि सुनील तटकरे यांच्यासह शरद पवारांची भेट घेतली व त्यांना शुभेच्छाही दिल्या. यावेळी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा आणि मोठा मुलगा पार्थही उपस्थित होते.

काका-पुतण्याचे राजकीय मार्ग वेगळे?

जवळपास साडेपाच दशके राजकारणात असलेल्या शरद पवार यांच्याच नेतृत्वाखाली अजित पवार यांनी आपली राजकीय कारकीर्द सुरू केली होती. या कालावधीत अजित पवार यांना शरद पवार यांनी अनेक राजकीय पदं दिली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर पक्षाचा जवळपास सर्वच कारभार त्यांच्या हाती सोपवला होता.

देशात भाजपची सत्ता आल्यानंतर अजित पवार यांच्या मागे चौकशांचा ससेमिरा सुरू झाला. त्यानंतर नेमकी काय राजकीय भूमिका घ्यायची यावरून दोन्ही नेत्यांमध्ये मतभेद झाले. ते हळूहळू तीव्र झाले आणि साधारण दीड वर्षांपूर्वी अजित पवार यांनी पक्षातील बहुतेक आमदारांना घेऊन भाजपसोबत जाणं पसंत केलं. तेव्हापासून काका-पुतण्या आमनेसामने आले होते. लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांनी अजित पवार यांना आस्मान दाखवलं, तर विधानसभा निवडणुकीत ४१ आमदार निवडून आणून अजितदादांनीही स्वत:चं नेतृत्व सिद्ध केलं. या दोन्ही निवडणुकांमध्ये पवार कुटुंबातील सदस्य प्रथमच एकमेकांसमोर उभे ठाकले. त्यातून अजित पवार व शरद पवार यांच्या वितुष्ट आले. या पार्श्वभूमीवर अजित पवार आणि शरद पवार यांच्या प्रत्येक हालचालीकडं राजकीय वर्तुळाचं व दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांचं लक्ष असतं.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर