sharad pawar : अजित पवार पुन्हा पक्षात परतले तर? शरद पवार म्हणाले, ते कुटुंबाचा भाग आहेतच, पण..
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  sharad pawar : अजित पवार पुन्हा पक्षात परतले तर? शरद पवार म्हणाले, ते कुटुंबाचा भाग आहेतच, पण..

sharad pawar : अजित पवार पुन्हा पक्षात परतले तर? शरद पवार म्हणाले, ते कुटुंबाचा भाग आहेतच, पण..

Jul 17, 2024 05:01 PM IST

Sharad Pawar on Ajit Pawar: अजित पवार पुन्हा परत येणार का?याबाबत बोलताना शरद पवार म्हणाले की,निवडणुका येतात आणि जातात. कुटुंब कायम राहतं. घरामध्ये सगळ्यांना जागा आहे.

अजित पवारांबाबत शरद पवारांचे मोठं वक्तव्य
अजित पवारांबाबत शरद पवारांचे मोठं वक्तव्य

Sharad Pawar on Ajit Pawar : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींना वेगआला आहे.सर्वच पक्षांकडून मोर्चेबांधणीला सुरुवात झाली असून, राष्ट्रवादी शरद पवार गटात जोरदार इनकमिंग सुरू झाले आहे. आजच पिंपरी चिंचवडमध्ये शहराध्यक्ष माजी महापौरांसह २४ नगरसेवकांनी अजित पवार गट सोडून शरद पवारांच्या पक्षात प्रवेश केला. अजित पवार यांनी पक्षात मोठे भगदाड पाडून सत्ताधारी गटात सामील होण्याचा निर्णय घेतला मात्र ते कधीही स्वगृही परतू शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. यावर शरद पवारांनी मोठं विधान केलं आहे.

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला मोठा फटका बसला त्यांचा केवळ एकच खासदार निवडून आला. यानंतर आताअजित पवार यांनी विधानसभेची तयारी सुरू करत राज्यभरात दौरे करण्याची योजना आखलीआहे. आज पत्रकारांशी बोलताना शरद पवार यांनी त्यांच्या गटातील इन्कमिंगबाबत भाष्य करताना अजित पवार यांच्याबाबत सूचक विधान केल्याचे सांगितले जात आहे.

अजित पवार पुन्हा परत येणार का? याबाबत बोलताना शरद पवार म्हणाले की,निवडणुका येतात आणि जातात. कुटुंब कायम राहतं. घरामध्ये सगळ्यांना जागा आहे. मात्र,पक्षांमध्ये जागा आहे की नाही हा व्यक्तिगत निर्णय मी घेणार नाही. अजित पवार राष्ट्रवादीतून वेगळे झाले असले तरी ते कुटुंबाचा भाग आहेतच. कुटुंब कधी वेगळे होत नाही. मात्र पक्षात मी व्यक्तिगत निर्णय घेणार नाही. त्यांना पक्षात पुन्हा यायचे असेल तर मला आधी पक्षाला विचारावे लागेल. कारण फुटीनंतर ज्यांनी संघर्षाचा काळ अनुभवला, जे सहकारी मजबुतीने उभे राहिले त्यांचे म्हणणे काय आहे? याला जास्त महत्त्वाचे आहे.मात्रतरीही ही जर तरची गोष्ट आहे, त्याबद्दल आता बोलणे योग्य नसल्याचे शरद पवार म्हणाले.

बारामतीत अजित पवारांनी विकास केल्याचे म्हणाले तरी लोकांनी तुम्हाला कसे मतदान केले, यावर शरद पवार म्हणाले अरे ती बारामती आहे. लोकांशी वैयक्तिक संबंध ठेवले पाहिजेत. याआधी मी निवडणुकीची सांगता सभा घेत होतो. मतदारसंघातील ५० टक्के लोकांनी मी नावाने ओळखायचो. पण आता जुनी लोकं नाहीत. मात्र मला खात्री होती बारामतीची जनता सुप्रियाला नक्की निवडून देतील.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर