मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  '२०१९ मध्ये शरद पवार भाजपसोबत सरकार स्थापन करणार होते, मात्र...', बावनकुळेंचा खळबळजनक गौप्यस्फोट

'२०१९ मध्ये शरद पवार भाजपसोबत सरकार स्थापन करणार होते, मात्र...', बावनकुळेंचा खळबळजनक गौप्यस्फोट

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Feb 22, 2023 10:32 PM IST

शरद पवार भाजपसोबत युती करणार होते मात्र त्यांनाफडणवीस नको होते, असा खळबळजनक गौप्यस्फोट चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.

बावनकुळेंचा खळबळजनक गौप्यस्फोट
बावनकुळेंचा खळबळजनक गौप्यस्फोट

पुणे - अजित पवार व देवेंद्र फडणवीस यांच्यातील पहाटेच्या शपथविधीचे कथानक अजूनही सुरूच आहे. अजित पवार, फडणवीस व तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. या वादात आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उडी घेत आणखी एक खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. 

बावनकुळे म्हणाले की, शरद पवार भाजपसोबत युती करणार होते मात्र त्यांना फडणवीस नको होते. शरद पवारांना भाजपसोबत सरकार स्थापन करण्यास काही हरकत नव्हती, पण फडणवीस मुख्यमंत्री नको होते, फडणवीस सोडून कुणीही मुख्यमंत्री आणि कुठलाही पक्ष चालला असता,  असं बावनकुळे म्हणाले आहेत. 

देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात झालेल्या पहाटेच्या शपथविधीचा वाद पुन्हा पंचवार्षिक निवडणुका एक वर्षावर येऊन ठेपल्या असतानाही असून कायम आहे. हा शपथविधी शरद पवारांसोबत चर्चा करूनच झाला होता, असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. फडणवीस यांच्या या गौप्यस्फोटावर अजित पवारांनी आपण यावर काहीही बोलणार नसल्याचं स्पष्ट केलं. यानंतर आता शरद पवार म्हणाले की, मी फडणवीसांना सुसंस्कृत राजकारणी समजत होतो असे म्हणत याचा इन्कार केला होता. 

त्यानंतर पवार म्हणाले की, पहाटेचा शपथविधी झाला नसता तर राष्ट्रपती राजवट उठली असती का? उध्दव ठाकरे मुख्यमंत्री झाले असते का? समजने वाले को इशारा काफी है,' असं सूचक विधान शरद पवारांनी केलं. 

WhatsApp channel