MCA Elections : एमसीए निवडणुकीत मोठी उलथापालथ.. शरद पवारांच्या पाठिंब्याने शेलार मैदानात!
मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (Mumbai cricket association elections) यंदाच्या निवडणुकीसाठी भाजप नेते आशिष शेलार आणि राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांचे संयुक्त पॅनल असणार असून या पॅनलमधून भाजप, शिवसेना तसेच शिंदे गट असे सर्व एकत्र येताना दिसणार आहेत.
मुंबई – मुंबई क्रिकेट असोसिएशन (MCA)अध्यक्षपदाची निवडणूक येत्या २० ऑक्टोबरला होणार असून या निवडणुकीत एकमेकांचे विरोधी गट असणारे शरद पवार (Sharad pawar) आणि आशिष शेलार (ashish shelar) आता संयुक्त पॅनल घेऊन मैदानात उतरणार आहेत. मुख्य म्हणजे राज्यात विरोधात असणारे आशिष शेलार आणि शरद पवार यांचं संयुक्त पॅनल मैदानात असणार आहे. संदीप पाटील स्वतंत्र निवडणूक लढवणार आहे. आशिष शेलार हे शरद पवारांच्या पॅनलमधून निवडणूक लढत असतानाच मिलिंद नार्वेकर आणि जितेंद्र आव्हाड हेदेखील एमसीएच्या आखाड्यात उतरले आहेत.
ट्रेंडिंग न्यूज
आशिष शेलार व शरद पवार पॅनलमध्ये लढत होईल असे सांगितले जात होते, मात्र आता यामध्ये ट्विस्ट आला असून दोन विरोधी पॅनल एकत्र आले आहेत. मंत्री नसलेला कोणताही आमदार ही निवडणूक लढवू शकतो, त्यामुळे आशिष शेलार अध्यक्षपदाची निवडणूक लढवत आहे. तसंच न्यायालयाने वयाची अट घातल्यामुळे शरद पवार निवडणुकीच्या आखाड्यात थेट उतरू शकत नाहीत. मिलिंद नार्वेकर आणि जितेंद्र आव्हाड यांनी अपेक्स काऊन्सिलसाठी स्वतंत्र अर्ज भरला आहे. विहंग सरनाईक यांनी एमपीएल अर्थात मुंबई प्रीमियर लीगसाठी अर्ज दाखल केला आहे.
विशेष म्हणजे मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (Mumbai cricket association elections) यंदाच्या निवडणुकीसाठी भाजप नेते आशिष शेलार आणि राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांचे संयुक्त पॅनल असणार असून या पॅनलमधून भाजप, शिवसेना तसेच शिंदे गट असे सर्व एकत्र येताना दिसणार आहेत. यावेळीआशिष शेलार अध्यक्षपदासाठी तर अमोल काळे उपाध्यक्षपदाची निवडणूक लढवणार आहेत. तर सचिवपदासाठी अजिंक्य नाईकांची उमेदवारी असूनसंयुक्त सचिव दीपक पाटील तर खजिनदारपदासाठी अरमान मलिकांना उमेदवारी दिली आहे. कार्यकारिणीत जितेंद्र आव्हाड,मिलिंद नार्वेकर,निलेश भोसले यांच्यासह९जण असणार आहेत. त्यामुळे विविध पक्षांचे नेते यावेळी मुंबई क्रिकेट असोसिएशनसाठी एका पॅनलमधून निवडणूक लढवणार आहेत.