Sharad Mohol Murder planning : शरद मोहोळ पुण्यातील कुख्यात गुंड असून त्याच्यावर हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी, अपहरण यासारखे अनेक गुन्हे नोंद आहेत. जर्मन बेकरी स्फोटातील संशयित दहशतवाद्याला मोहोळ याने तुरुंगातच मारले होते. त्यानंतर त्यांची हिंदू डॉन अशी ओळख निर्माण झाली होती. तब्बल १५ वर्ष दहशत माजवल्यावर अखेर याच गुंडगिरीने त्याचा जीव घेतला. साहिल उर्फ मुन्ना संतोष पोळेकर व नामदेव कानगुडे हा शरद मोहोळ याच्या हत्येचा मास्टर माइंड होता. शरद मोहोळला मारण्यासाठी त्याने महिन्याभरपासून प्लॅनिंग केले होते. या साठी त्याने त्याची माणसं मोहोळच्या टोळीत पेरले. त्यांनी शरद मोहोळचा विश्वास संपादन करून एखादा सिनेमाच्या कथानकाप्रमाणे त्याचे बॉडीगार्ड होऊन शुक्रवारी हत्या केली.
मिळालेल्या माहितीनुसार जमिनीच्या वादावरून ८ दिवसांपूर्वी साहिल उर्फ मुन्ना संतोष पोळेकर आणि शरद मोहोळ याची बाचाबाची झाली होती, हाच वाद मोहोळच्या जिवावर उठला. शरद मोहोळ हा मुळशी तालुक्यातील असून मुठा हे शरद मोहोळ याचे गाव आहे. या ठिकाणी त्याच्या मोठ्या जमिनी आहेत. त्याला लागून पोळेकरचीची देखील जमिन आहे, या जमिनीच्या खरेदी विक्रीवरून दोघांमध्ये काही दिवसांपासूंन वाद सुरू होते. काही दिवसांपूर्वी शरद मोहोळने मुन्ना पोळेकरला बोलवून त्याला मारहाण देखील केली होती. याचा बदला घेण्याचे पोळेकरने ठरवले होते.
साहिल पोळेकरने एक महिन्यापूर्वी त्याचे काही साथीदार मोहोळ टोळीत घुसवले होते. शरद मोहोळचे हे मारेकरी त्याचे साथीदार म्हणून टोळीत वावरत होते. त्यांनी शरद मोहोळचा विश्वास देखील संपादन केला होता. साहील पोळेकर हा हत्येच्या आधी काहीवेळ शरद मोहोळच्या घरी गेला होता. त्याने त्याच्या लग्नाचा वाढदिवस देखील साजरा केला. सोबत असलेले हे मारेकरी मोहळवर अनेक कारणांनी नाराज होते. विठ्ठल गांडले याच्यासोबत शरद मोहोळची मुळशी तालुक्यात अनेक जुन्या प्रकरणावरून वाद होते. तर साहिला मोहोळ याने जमीनिच्या वादातून मारहाण देखील केली होती. यामुळे दोघांनी मिळून त्याच्या हत्येचा कट रचला.
शुक्रवारी शरद मोहोळ हा लग्नाच्या वाढदिवसानिमित्त मांदजरात जात होता. यावेळी विठ्ठल गांडले, नितीन कानगुडे आणि साहील पोळेकर हे तिघे बॉडीगार्ड म्हणून त्याचा सोबत होते. मात्र, आपले बॉडीगार्डच आपला घात करतील याची थोडी देखील माहिती नसतांना त्यांच्या जोरावर मोहळ बाहेर पडला. कोथरूडच्या सुतारदरा भागातील घरातून मोहोळ बाहेर पडला. थोड्या अंतरावर जात नाही तर तिघांनी त्याच्यावर जवळून गोळ्या झाडल्या. दोन गोळ्या शरद मोहोळच्या मानेत तर एक गोळी डोक्यात लागल्याने मोहोळ गंभीर जखमी झाला. त्याला दवाखान्यात उपचार सुरू असतांना मृत्यू झाला.
घटनेनंतर घटनास्थळी असलेले आरोपीचे दुसरे साथीदार हे दोन गाड्या घेऊन थांबले होते. मारेकरी आणि तयांचे इतर चार साथीदार हे पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरून पळाले. मात्र, काल रात्री गुन्हे शाखेच्या ९ पथकांनी त्यांचा माग काढून त्यांना अटक केली.