मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sharad Mohol : शरद मोहोळची पत्नी स्वाती मोहोळ यांनी फडणवीसांची भेट घेत केली मोठी मागणी, काय म्हणाले गृहमंत्री?

Sharad Mohol : शरद मोहोळची पत्नी स्वाती मोहोळ यांनी फडणवीसांची भेट घेत केली मोठी मागणी, काय म्हणाले गृहमंत्री?

Jan 07, 2024 11:37 PM IST

Sharad Mohol Murder case : शरद मोहोळ यांच्या पत्नीनं गृहमंत्र्यांची भेट घेतली आहे. तसेच त्यांच्यात दोन मिनिटांचा संवादसुद्धा झाला आहे. पुण्यातील भाजपा कार्यालयाच्या उद्घाटनानंतर ही भेट झाली आहे.

wati mohol meet Devendra fadanvis
wati mohol meet Devendra fadanvis

पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ (Sharad Mohol) याचा शुक्रवारी दिवसाढवळ्या त्याच्याच साथीदाराने गोळ्या घालून गेम केला. शरद मोहोळवर हल्लेखोरांनी चार गोळ्या झाडल्या त्यातील त्यातील तीन गोळ्या मोहोळच्या शरीरात घुसल्या होत्या. गंभीर अवस्थेत त्याला जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. मात्र, त्याचा उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणात ८ आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यातील दोन नामांकित वकील असल्याचे समोर आले आहे. या घटनेनंतर पुण्यात एकच खळबळ उडाली असून त्यातच आज शरद मोहोळची पत्नी स्वाती मोहोळ (Sharad Mohol Wife) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन न्याय देण्याची मागणी केली. 

देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी पुण्यात प्रतिक्रिया दिली होती की, गुंड कुठला का असेना त्याचा आम्ही बंदोबस्त करू, त्यानंतर रविवारी त्याच गुंडाच्या पत्नीनं गृहमंत्र्यांची भेट घेतली आहे. तसेच त्यांच्यात दोन मिनिटांचा संवादसुद्धा झाला आहे. पुण्यातील भाजपा कार्यालयाच्या उद्घाटनानंतर ही भेट झाली आहे. 

शरद मोहोळची पत्नी स्वाती मोहोळ यांनी डीपी रोडवरील पुणे शहर भाजपाच्या नव्या कार्यालयाजवळ देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. स्वाती मोहोळ या पुणे भाजपच्या पदाधिकारी असून त्यांनी गेल्या वर्षी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्या नगरसेवक निवडणुकीच्या तयारीला लागल्या आहेत. शरद मोहोळ देखील राजकारणात येणार अशी चर्चा होती. त्यातच पुण्यातील गुंडगिरीबाबत देवेंद्र फडणवीस कोणते निर्देश देणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस आणि स्वाती मोहोळ यांच्यात काय चर्चा झाली? असा सवाल देखील उपस्थित होताना दिसतोय.

ट्रेंडिंग न्यूज

पुणेच नाही तर राज्यात कुठंही टोळीयुद्ध होणार नाही, तसंच कायदा आणि सुव्यवस्थेचाही प्रश्न निर्माण होणार नाही. सदर कुख्यात गुंडाची हत्या त्याच्याच साथीदारांनी केली आहे. गुंड कुणीही असो, त्याचा बंदोबस्त शासनाद्वारे केला जातो, त्यामुळे असं टोळीयुद्ध करण्याचा कुणीही प्रयत्न करणार नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात माध्यमांशी बोलताना म्हटलं होतं. 

कुख्यात गुंड शरद मोहोळ घरातून बाहेर पडल्यानंतर त्याच्यासोबत असलेल्या तीन साथीदारांनीच त्याच्यावर बेछूट गोळीबार करून त्याची हत्या केली होती. आरोपी मुन्ना उर्फ साहिल पोळेकर (२०, रा. सुतारदरा) हा या हत्याकांडातील मास्टरमाईंड आहे. मुन्ना पोळेकर हा शरद मोहोळ याच्याबरोबर नेहमी फिरायचा. 

WhatsApp channel
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर