मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sharad Mohol : शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी गणेश मारणेला अखेर अटक

Sharad Mohol : शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी गणेश मारणेला अखेर अटक

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jan 31, 2024 11:04 PM IST

Sharad Mohol Murder Case : शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी गणेश मारणेला अटक करण्यात पुणे पोलिसांना अखेर यश आले आहे. शरद मोहोळ हत्येनंतर तो फरार होता.

Sharad Mohol Murder Case
Sharad Mohol Murder Case

Sharad Mohol Case : पुण्यात गँगस्टर शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी कुख्यात गुंड गणेश मारणेला अटक करण्यात पुणे पोलिसांना अखेर यश आले आहे. पुणे पोलिसांनी मोठी कारवाई करत संगमनेर येथून त्याला अटक केली आहे. पोलिसांना बघून पळ काढणाऱ्या मारणेला पोलिसांनी थरारक पाठलाग करत पकडले. त्याच्यासह तीन जणांना पुणे पोलिसांनी आज पकडले. 

गणेश मारणे हा शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी असून तो गेल्या अनेक दिवसांपासून फरार होता. पुणे पोलिसांकडून शरद मोहेळ हत्याप्रकरणातील मुख्य सुत्रधार गणेश मारणे, विठ्ठल शेलार यांच्यासह १६ जणांवर मोक्का लावला आहे. पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळची दिवसाढवळ्या घराजवळच गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या घटनेने पुण्यासह राज्यात खळबळ उडाली होती. 

शरद मोहोळ हत्या प्रकरणात आतापर्यंत २० हून अधिक जणांना अटक करण्यात आली आहे. शरद मोहोळची हत्या झाल्यानंतर काही तासांतच सात जणांना अटक केली होती. त्यानंतर १५ जानेवारी रोजी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने शरद मोहोळ हत्या प्रकरणात दहा जणांना पनवेल आणि वाशीमधून अटक केली. 

दरम्यान, याआधी गणेश मारणेने अटकपुर्व जामीन मिळवण्यासाठी कोर्टात धाव घेतली होती. मात्र कोर्टाने त्याचा अर्ज फेटाळला होता. सरकार पक्षाची बाजू ऐकल्याशिवाय अंतरिम अटकपूर्व जामिनाचे संरक्षण देता येणार नाही, असं कोर्टाने म्हटलं होतं. त्यानंतर तो फरार होता.

WhatsApp channel