मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  sharad mohol case : शरद मोहोळ हत्या प्रकरणी पनवेलमध्ये कारवाई! गुंड विठ्ठल शेलार, रामदास मारणेला अटक; ११ जण ताब्यात

sharad mohol case : शरद मोहोळ हत्या प्रकरणी पनवेलमध्ये कारवाई! गुंड विठ्ठल शेलार, रामदास मारणेला अटक; ११ जण ताब्यात

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Jan 15, 2024 11:10 AM IST

sharad mohol case : पुण्यातील अट्टल गुंड शरद मोहोळ खून प्रकरणी पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पनवेल आणि वाशीमध्ये कारवाई करत ११ जणांना अटक करण्यात आली आहे.

gangster sharad mohol murderer arrested
gangster sharad mohol murderer arrested

shard mohol case : गुंड शरद मोहोळ याचा खून प्रकरणात पनवेल पोलिसांनी आणखी ११ जणांना अटक केली आहे. नवी मुंबई पोलिसांनी मुंबईच्या पनवेल आणि वाशी परिसरात धाड टाकून ही कारवाई केली. गुंड विठ्ठल शेलार, रामदास मारणेला अटक करण्यात आली आहे. या पूर्वी तिघांना अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालायाने १७ जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Kala Chowki Fire : मोठी बातमी! मुंबईत काळाचौकी परिसरातील महापालिका शाळेत सिलिंडरचे भीषण स्फोट

पुण्यातील हिंदू गुंड म्हणून ओळख असलेल्या शरद मोहोळची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी पुणे पोलिसांनी सुरवातीला आठ आरोपींना अटक केली होती. यात दोन वकिलांचा देखील समावेश होता. दरम्यान, शनिवारी आणखी तिघांना अटक करण्यात आली होती. यात एका केंद्रीय कर्मचाऱ्याचा देखील समावेश होता. या प्रकरणात आरोपींनी गोळीबाराचा सराव केला होता. तसेच त्यांना हत्यारे आणि पैसा कुणी पुरवला याचा पोलिस तापस करत होते. हा तपास करत असतांना पनवेल पोलिसांच्या पथकाने पनवेल आणि वाशी येथे कारवाई करत ११ जणांना अटक केली आहे. यात शरद मोहोळ हत्येच्या कटातील मुख्य आरोपी रामदास मारणे, शेलारला अटक करण्यात आली आहे. यातील तीन आरोपी हे मुख्य आणि संशयीत आहेत. पनवेल पोलीसांनी पनवेल येथील एका फार्म हाऊसवर कारवाई करत आरोपींना अटक केली आहे. आरोपींना पुणे पोलीसांच्या ताब्यात दिले आहे.

धावत येऊन पायलटला घातला गुद्दा! IndiGOच्या फ्लाइटमध्ये गोंधळ; व्हिडिओ व्हायरल

विठ्ठल शेलार, रामदास उर्फ वाघ्या मारणे यांचा शरद मोहोळच्या हत्येचा कट रचण्यात सहभाग असल्याच तपासात निष्पन्न झाले आहे. यानंतर ही कारवाई करण्यात अलायी. हे दोघेही पनवेल किंवा वाशी येथे लपून असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर शोध मोहीम राबवण्यात आली. रवीवारी रात्री पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने नवी मुंबई पोलिसांसह आरोपी लपले असलेल्या ठिकाणी छापा टाकला. या आरोपींना उद्या न्यायालयात हजर केले जाणार आहे.

India Maldives Tension: १५ मार्चपर्यंत सैनिकांना माघारी बोलवा; मालदीवचा भारताला अल्टिमेटम

तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील तांबे यांनी न्यायालयात सांगितले की, मोहोळचा खून करण्यापूर्वी मुन्ना पोळेकर आणि त्याच्या साथीदारांनी हडशी गावात गोळीबाराचा सराव केला होता. त्यावेळी आरोपी नितीन खैरे आणि आदित्य गोळे हे सहभागी झाले होते. तसेच खैरे आणि गोळे यांनी आरोपीला शस्त्र खरेदीसाठी आर्थिक मदत केली आहे. तसेच खुनाच्या कटात त्याचा सहभाग आहे. त्याने इतर आरोपींकडून तयारी करून घेतली. खैरे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. तसेच मोहोळचा खून होण्यापूर्वी आरोपींची मिटिंग झाली होती त्याला आरोपी आदित्य गोळे उपस्थित होते. मोहोळचा खून केल्यानंतर मुन्ना पोळेकरसह इतर आरोपी हे कोल्हापूरच्या दिशेने पळून जात होते. यावेळी खेड शिवापूर टोल नाक्याच्या पुढे हे आरोपी थांबले. त्यावेळी आरोपींना त्यांचे नातेवाईक भेटायला आले होते. त्यावेळी आरोपीला एक नवीन सिम कार्ड देण्यात आले. आरोपीने पहिले सिमकार्ड काढून नवीन सिम कार्ड मोबाईल मध्ये टाकले आणि पहिला फोन संतोष कुरपेला करून सांगितले की, शरद मोहोळचा गेम केला असून ही गोष्ट मास्टर माईंडला सांगा असे सांगितले होते.

मोहोळचा खून करण्यासाठी ४ पिस्टल आणण्यात आले होते. त्यातील ३ पिस्टल जप्त करण्यात आले आहे. यातील १ पिस्टल संदर्भातील माहिती खैरे आणि गोळे याला आहे. हडशी येथे गोळीबाराचा सराव केला होता त्यावेळी अजून काही आरोपी उपस्थित होते. मुन्ना पोळेकर आणि इतर आरोपीचा सोबत तपास करायचा असल्याने ५ दिवसांची पोलीस कोठडीची मागणी तांबे यांनी केली होती.

Pune lashkar murder : बहिणीची छेड काढल्याने सराईत गुंडाचा खून; पुण्यातील लष्कर येथील घटना, तिघांना अटक

त्याला विरोध करतांना आरोपीच्या वतीने लोक अभिरक्षक कार्यालच्या वतीने मयूर दोडके यांनी बाजू मांडली. यावेळी ऍड दोडके यांनी न्यायालयात सांगितले की, संतोष कुरपे यांना अनओळखी क्रमांकावरून फोन आल्याने उचलला. पलीकडून शरद मोहोळचा गेलं केला असून मास्टरला सांगा असे सांगितले. तसेच पोलिसांनी चौकशीसाठी ११ जानेवारीला बोलावले होते. त्यावेळी माहिती दिल्याने कमीत कमी पोलीस कोठडी देण्याची मागणी केली होती. न्यायालयाने दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून आरोपीना १७ जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

WhatsApp channel