Sharad Mohol : मोहोळ खून कटात दोन नामांकित वकिलांचा सहभाग, सीसीटीव्ही फूटेज समोर
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sharad Mohol : मोहोळ खून कटात दोन नामांकित वकिलांचा सहभाग, सीसीटीव्ही फूटेज समोर

Sharad Mohol : मोहोळ खून कटात दोन नामांकित वकिलांचा सहभाग, सीसीटीव्ही फूटेज समोर

Jan 06, 2024 02:19 PM IST

Sharad Mohol Murder Case Update : कुख्यात गुंड शरद मोहोळ यांच्या हत्येचे सीसीटीव्ही फुटेज पुढे आले आहे. यात मारेकरी गोळ्या झाडून फरार होताना दिसत आहे.

Sharad Mohol Murder Case Update
Sharad Mohol Murder Case Update

Sharad Mohol Murder Case : कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्या हत्येप्रकरणी मोठी माहिती पुढे आली आहे. शरद मोहोळ खून प्रकरणात दोन नामांकित वकीलांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. रवींद्र पवार आणि संजय उड्डाण अशी त्यांची नावे असून दोघेही शिवाजी नगर सत्र न्यायालयात प्रँक्टीस करतात. पुणे गुन्हे शाखेच्या पथकाने या दोघांनाही इतर आरोपींसोबत रात्री अटक केली. दरम्यान, मोहोळ याच्या हत्येचे सीसीटिटीव्ही फुटेज देखील पुढे आले आहे. यात तीन मारेकरी त्याच्यावर गोळ्या झाडतांना दिसत आहे. काल रात्री या प्रकरणी ८ जणांना अटक करण्यात आली आहे.

Railway mega block : महत्त्वाची बातमी! पुणे-लोणावळा मार्गावर उद्या रेल्वेचा मेगाब्लॉक; अनेक गाड्या रद्द

कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्यावर कोथरुड परिसरातील सुतारदरा येथे शुक्रवारी दुपारी गोळीबार करण्यात आला होता. अज्ञात आरोपींनी शरद मोहोळ याच्यावर चार गोळ्या झाडत त्याची हत्या केली होती. या घटनेमुळे खळबळ उडाली होती. साहिल उर्फ मुन्ना संतोष पोळेकर (रा, सुतारदरा, कोथरूड) याने त्याच्या साथीदारांच्या मदतीने मोहोळवर गोळीबार केला. मोहोळ हा लग्नाच्या वाढदिवसानिमित्त मंदिरात जात होता. यावेळी मारेकरी हे त्याचे बॉडीगार्ड म्हणून त्याच्या सोबत होते. जुन्या वादातून संधि मिळताच त्यांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या.

एकतर्फी प्रेमातून मामेभाऊ सतत छळायचा; त्रासलेल्या तरुणीनं घरी बोलवून जिवंत जाळलं!

या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज हिंदुस्तान टाइम्स मराठीच्या हाती लागले आहे. शुक्रवारी शरद मोहोळच्या लग्नाचा वाढदिवस होता. शरद मोहोळने त्याच्या पत्नीसोबत वाढदिवस साजरा केला. लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी तो मंदिरात जात असताना त्याच्यावर २ च्या सुमारास भरदिवसा गोळ्या झाडण्यात आला. शरद मोहोळचे साथीदा असलेले त्याचे सहकारी यांनीची त्याच्यावर बंदुकीतून चार गोळ्या झाडल्याचे दिसत आहे. यातील दोन गोळ्या या मानेला आणि एक गोली ही डोक्यात लागल्याचे दिसत आहे. शरद मोहोळ रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडला. दरम्यान, आजू बाजूच्या नागरिकांनी आरोपींना पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपी आधीच त्या ठिकाणी असलेल्या त्यांच्या दोन साथीदारांच्या गाडीतून पळ काढला.

अटक करण्यात आलेले दोन वकिलांनी आरोपींना पळून जाण्यात मदत केली. आरोपींना कट रचण्यात आणि त्यांना पळून लावण्यात या वकिलांनी मदत केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दोन्ही वकिलांना थोड्याच वेळात कोर्टात हजर करणार आहेत. शरद मोहोळ हत्या प्रकरणात या दोन वकिलांचा काय सहभाग होता? या प्रकरणात आणखी मोठ्या व्यक्तीचा सहभग आहे का? हत्येचे नेमकं कारण काय? याचा तपास पोलिस करत आहे.

 दरम्यान पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. साहील उर्फ मुन्ना संतोष पोळेकर (वय २०, रा. शिवशक्ती नगर, गल्ली नं. २७/७ सुतारदरा कोथरुड पुणे), नामदेव महीपती कानगुडे (वय ३५, रा. भुगाव ता. मुळशी जि. पुणे), अमित उर्फ अमर मारुती कानगुडे (वय २४, रा. लेन नं. ९५ स्वराज्य मित्र मंडळ पर्वती पुणे), चंद्रकांत शाहु शेळके (वय २२, रा. लेन नं. ९४ जनता वसाहत पर्वती पुणे), विनायक संतोष गाव्हणकर (वय २०, रा. पौड, ता. मुळशी जि. पुणे), विठ्ठल किसन गांदले (वय ३४, रा. शिवकल्याण नगर सुतारदरा कोथरुड पुणे), अॅड. रविंद्र वसंतराव पवार (वय ४०, रा. नांदेगाव ता. मुळशी जि. पुणे), अॅड. संजय रामभाऊ उडान (वय ४३, रा. भुसारी कॉलनी कोथरुड) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. 

आरोपीकडून गुन्हयात वापरलेले ३ गावठी पिस्टल, ३ मॅगझीन, ५ जिवंत काडतुसे ८ मोबाईल हॅन्डसेट, रोख रक्कम असा एकुण २२.३९.८१० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. आरोपींनी सदरचा गुन्हा हा शरद मोहोळ बरोबर असलेल्या जुन्या वादाच्या कारणावरुन केला असल्याचे प्रथमदर्शनी उघडू झालेले आहे. गुन्हे शाखा पुणे शहर यांनी तात्काळ कारवाई करुन घटनास्थळी गोळीबार करणा-या व त्यांना मदल करणा-या आरोपीना ८ तासाच्या आत ताब्यात घेवुन संवेदनशील खुनाचा गंभीर गुन्हा उघडकीस आणला आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर