मराठी बातम्या  /  क्रीडा  /  'झूमे जो पठाण' गाणं ऐकल्यानंतर विराट, जाडेजालाही राहवलं नाही; भरमैदानात दोघांनी...व्हिडिओ व्हायरल!

'झूमे जो पठाण' गाणं ऐकल्यानंतर विराट, जाडेजालाही राहवलं नाही; भरमैदानात दोघांनी...व्हिडिओ व्हायरल!

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Feb 14, 2023 06:06 PM IST

Virat Kohli, Ravindra Jadeja Viral Video: ऑस्ट्रलियाविरुद्ध मोठ्या विजयानंतर भरमैदानात भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजा 'झूमे जो पठाण' या गाण्यावर शाहरुखच्या सिग्नेचर स्टेप करताना दिसले.

Virat Kohli Viral Video
Virat Kohli Viral Video

Virat Kohli and Ravindra Jadeja Performing Signature Step of Pathaan Song: बॉक्स ऑफिसवर हिट झालेल्या शाहरुख खानच्या 'पठाण'ने सर्व रेकॉर्ड मोडले. इतर विक्रम लवकरच मोडीत निघतील असं सांगितलं जातं. 'पठाण' हा शाहरुख खानच्या कारकिर्दीतील आणि बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनला आहे. या चित्रपटातील ‘झूमे जो पठाण’ आणि ‘बेशरम रंग’ या गाण्यांनाही लोकांनी भरभरून दाद दिली आहे. दरम्यान, भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली आणि अष्टपैलू रवींद्र जडेजा यांनी भरमैदानात ‘झूम जो पठाण’ या गाण्यावर थिरकताना दिसले. या व्हिडिओवर शाहरुख खानने प्रतिक्रिया दिली आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात गेल्या आठवड्यात पहिला कसोटी सामना खेळण्यात आला. नागपूर येथे झालेल्या सामन्यात भारताने १ डाव आणि १३२ धावांनी विजय मिळवला. या विजयानंतर विराट कोहली आणि रवींद्र जाडेजा झुमे जो पठाण या गाण्यावर थिरकताना दिसले. @Asifsrksoldier ट्विटर हँडलवरून विराट आणि जाडेजा यांचा १० सेकंदाचा व्हिडिओ शेअर केला. यानंतर स्वत: शाहरूख खानने या व्हिडिओवर आपली खास प्रतिक्रिया दिली आहे.

'पठाण'मध्ये शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद यांनी केले असून यशराज फिल्म्स निर्मित आहे. हा चित्रपट 25 जानेवारी 2023 रोजी हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषेत प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात सलमान खानचाही एक कॅमिओ दिसला. या चित्रपटाने चांगली कमाई केली आहे. जगभरातील बॉक्स ऑफिस कलेक्शनमध् या चित्रपटाने सुमारे 960 कोटींची कमाई केली आहे. लवकरच हा आकडा 1000 कोटींचा आकडा गाठेल अशी अपेक्षा आहे.

WhatsApp channel