बदलापूर पुन्हा हादरलं! अंधाऱ्या ठिकाणी नेऊन ६ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, आरोपी अल्पवयीन
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  बदलापूर पुन्हा हादरलं! अंधाऱ्या ठिकाणी नेऊन ६ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, आरोपी अल्पवयीन

बदलापूर पुन्हा हादरलं! अंधाऱ्या ठिकाणी नेऊन ६ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, आरोपी अल्पवयीन

Jan 18, 2025 09:52 AM IST

Badlapur Crime : बदलापूर येथे एका ६ वर्षांच्या मुलीवर अत्याचार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. बदलापूर पश्चिम पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा धक्कादायक प्रकार घडला आहे.

बदलापूर पुन्हा हादरलं! अंधाऱ्या ठिकाणी नेऊन ६ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, आरोपी अल्पवयीन
बदलापूर पुन्हा हादरलं! अंधाऱ्या ठिकाणी नेऊन ६ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, आरोपी अल्पवयीन

Badlapur Crime : बदलापूर येथे मुलींवरील अत्याचाराच्या घटना सुरूच आहे. बदलापूर पश्चिम पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका ६ वर्षांच्या चिमूरडीवर अत्याचार करण्यात आल्याचं पुढं आलं आहे. आरोपीने या मुलीला अंधाऱ्या निर्जनस्थळी नेलं व तिच्यावर अत्याचार केले. आरोपी हा देखील अल्पवयीन असल्याची माहिती आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहीतीनुसार आरोपी हा अल्पवयीन आहे. तो पीडित मुलीच्या घराजवळ राहतो. त्याने मुलीला मुलीला खेळायच्या बहाण्याने अंधार असलेल्या निर्जन स्थळी नेलं. या ठिकाणी त्याने तिच्यावर अत्याचार केले. दरम्यान, पीडित मुलीला दुसऱ्या दिवशी आई वडील शाळेत पाठवत होते. मात्र, तिला शाळेत जायचं नाही अशी पीडित मुलगी घाबरून आईला सांगत होती. त्यामुळे मुलीच्या आईला संशय आला. मुलीच्या आईने तिला विश्वासात घेत, तिची विचारपूस केली. यानंतर तिने तिच्या सोबत घडलेला प्रकार सांगितला. या घटनेमुळे आईला मोठा धक्का बसला.

मुलीच्या आई वडिलांनी थेट बदलापूर पोलीस स्टेशनमध्ये जात गाठलं आणि तक्रार दिली. यानंतर बदलापूर पोलिसांनी या प्रकरणी पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. त्याला भिवंडी बाल न्यायालयात हजर केले आहे.

बदलापूर येथील एका नामवंत शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर सफाई कर्मचारी असलेल्या अक्षय शिंदेने अत्याचार केले होते. या घटनेमुळे बदलापूरसह संपूर्ण महाराष्ट्र पेटला होता. आरोपी अक्षय शिंदेला अटक करण्यात आली होती. तसेच त्याच्यावर कठोर कारवाई करण्यासाठी बदलापूरकर येथे आंदोलंन पेटले होते. संपूर्ण बदलापूर बंद करण्यात आले होते. या प्रकरणी खटला सुरू असतांना, त्याला न्यायालयात नेले जात होते. यावेळी अक्षय शिंदेने पोलिसांच्या जीपमधून जात असतानाच पोलिसांची बंदूक खेचून घेत गोळीबार केला. यात पोलिसांनी देखील अक्षय शिंदेवर गोळीबार करत त्याचा एन्काऊंटर केला होता.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर