Sangli Rape: सांगलीत ४ वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून हत्या, मृतदेह पेटीत लपवला
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sangli Rape: सांगलीत ४ वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून हत्या, मृतदेह पेटीत लपवला

Sangli Rape: सांगलीत ४ वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून हत्या, मृतदेह पेटीत लपवला

Ashwjeet Jagtap HT Marathi
Updated Feb 06, 2025 10:03 PM IST

4-Year-Old Girl Rape in Sangli: सांगलीत चार वर्षाच्या मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी पोलिसांनी एका नराधमाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

 सांगलीत ४ वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून हत्या
सांगलीत ४ वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून हत्या

Sangli Rape News: सांगली जिल्ह्यातून अत्यंत संतापजनक घटना उघडकीस आली. चार वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. त्यानंतर तिचा मृतदेह पेटीत लपवला. याप्रकरणी पोलिसांनी एका नराधमाला अटक केली. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. याप्रकरणातील आरोपीला कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.

सांगली जिल्ह्यामधील जत तालुक्यातील करजगे गावात ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी पांडुरंग सोमनिंग कळळी पुजारीला बेड्या ठोकल्या आहेत. आरोपी हा चिमुरडीच्या शेजारी राहतो. मिळालेल्या माहितीनुसार, चिमुरडी गुरुवारी सकाळपासून बेपत्ता होती. नातेवाईकांनी तिचा शोध घेतला. पंरतु, ती कुठेच सापडली नाही. यानंतर गावात दवंडी पिटवून शोध सुरू करण्यात आला.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पुढील शोध सुरू केला. त्यावेळी पोलिसांना आरोपी संशयितरित्या फिरत असल्याचे दिसून आले. यानंतर पोलिसांनी त्याच्या घराची झडती घेतली असता एका पत्र्याच्या पेटीत मुलगी मृतावस्थेत आढळून आली. पोलिसांनी आरोपीला खाक्या दाखवतात त्याने चिमुरडीची हत्या केल्याची कबूली दिली. हत्येआधी आरोपीने चिमुरडीवर अत्याचार करण्यात आला असावा, असा पोलिसांना संशय आहे. पोलिसांनी चिमुरडीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. शवविच्छेदनाच्या अहवालानंतरच अनेक गोष्टी स्पष्ट होतील. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Ashwjeet Jagtap

TwittereMail

अश्वजीत जगताप हिंदुस्तान टाइम्स मराठीमध्ये सीनिअर कन्टेंट रायटर म्हणून कार्यरत आहे. अश्लजीत येथे राजकारण, क्राइम, स्पोर्ट्स, टेक्नोलॉजी, ऑटो, व्हायरल न्यूज आणि करिअर संबंधित बातम्या लिहितो. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात एकूण ५ वर्षांचा अनुभव आहे. यापूर्वी लेटेस्टली- मराठी (डिजिटल), एबीपी माझा (डिजिटल) मध्ये कामाचा अनुभव. अश्वजीतला क्रिकेट आणि बुद्धिबळ खेळणे आणि बायोपिक चित्रपट पाहायला आवडतात.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर