मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  sextortion : सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात अडकवत ७० वर्षांच्या वृद्धाला तब्बल लाखोंनी लुटले; गुन्हा दाखल

sextortion : सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात अडकवत ७० वर्षांच्या वृद्धाला तब्बल लाखोंनी लुटले; गुन्हा दाखल

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Dec 03, 2022 10:36 PM IST

sextortion : पुण्यात पुणे पोलिसांनी सेक्सटॉर्शनप्रकरणी राजस्थान येथे जाऊन कारवाई करण्याची घटना ताजी असताना पनवेलमध्ये एका वृद्धाला सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात अडकवून त्याला लाखो रुपयांनी लुटल्याची घटना उघडकीस आली आहे.

sextortion
sextortion

पनवेल : सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात अडकवून अनेकांना ब्लॅकमेळ करण्यात येत असल्याच्या घटना वाढल्या आहेत. पनवेल येथील एका ७० वर्षीय वृद्धाला देखील सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात अडकवून तब्बल तीन लाख रुपये लाटल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी एका वृद्धाने तक्रार दिली आहे. संबधित व्यक्ती हे पत्नीसोबत पनवेल येथे राहतात. त्यांची मुले ही परदेशी राहतात. काही दिवसांपूर्वी पीडित वृद्धाच्या व्हॉट्सअपवर निशा शर्मा नावाच्या महिलेने अश्लील आणि नग्न फोटो पाठवले होते. त्यानंतर सदर महिलेने त्याच दिवशी ज्येष्ठ नागरिकाला व्हिडीओ कॉलव्दारे संपर्क साधून स्व:ताचे अश्लील आणि नग्न फोटो दाखवून त्यांना सुद्धा तसे करण्यास भाग पाडले होते.यावेळी या ज्येष्ठ नागरिकाचा अश्लील व्हिडिओ रेकॉर्ड करून तो ज्येष्ठ नागरिकाला व्हॉट्सअपवर पाठवून त्याला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली.

पैसे न दिल्यास व्हिडीओ सोशल मिडियावर अपलोड करून बदनामी करण्याची धमकी दिली. त्यावेळी ज्येष्ठ नागरिकाने घाबरून सदरचे व्हिडीओ डिलीट केले. मात्र, वृद्धाला धमकावणे सुरूच ठेवले. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकाने घाबरून राहुल शर्मा याच्या मोबाईलवर संपर्क साधला असता त्याने सदरचे अश्लिल व्हिडीओ डिलीट करण्यासाठी वेळोवेळी ३ लाख १५ हजार रुपये उकळले. मात्र, त्यानंतर देखील सदर टोळीने वेगवेगळी करणे सांगून आणखी रक्कम मागण्यास सुरुवात केल्यानंतर आपली फसवणूक होत असल्याचे ज्येष्ठ नागरिकाच्या लक्षात आले. यानंतर त्यांनी पोलिसांत धाव घेत या प्रकरणी तक्रार दिली.

 

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या

विभाग