Satara crime news : धक्कादायक! साताऱ्यात अनाथाश्रमातील सेक्स स्कॅन्डलचा पर्दाफाश! अनाथ तरुणींना गोवले वेश्या व्यवसायात-sex scandal exposed in karad of satara forced prostitution of girls in name of orphanage two arrested ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Satara crime news : धक्कादायक! साताऱ्यात अनाथाश्रमातील सेक्स स्कॅन्डलचा पर्दाफाश! अनाथ तरुणींना गोवले वेश्या व्यवसायात

Satara crime news : धक्कादायक! साताऱ्यात अनाथाश्रमातील सेक्स स्कॅन्डलचा पर्दाफाश! अनाथ तरुणींना गोवले वेश्या व्यवसायात

Aug 23, 2024 08:10 AM IST

Satara crime news : साताऱ्यात एका अनाथ आश्रमात वेश्या व्यवसाय सुरू असल्याचं उघड झालं आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.

धक्कादायक! साताऱ्यात अनाथाश्रमातील सेक्स स्कॅन्डलचा पर्दाफाश! तरुणींना गोवले वेश्या व्यवसायात
धक्कादायक! साताऱ्यात अनाथाश्रमातील सेक्स स्कॅन्डलचा पर्दाफाश! तरुणींना गोवले वेश्या व्यवसायात (HT)

Satara crime news : सातारा येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सामाजिक उपक्रम म्हणून चालवण्यात येत असलेल्या मुलींच्या अनाथ आश्रमात वेश्या व्यवसाय सुरू असल्याचं उघड झालं आहे. या प्रकरणी आश्रम चालक महिला व तिच्या एका प्रियकराला अटक करण्यात आली आहे. हा धक्कादायक प्रकार साताऱ्यातील कराडमधील टेंबू गावातील निराधार आश्रमात सुरू होता.

 रेखा सकट व वाल्मिकी माने माने अशी आरोपींची नावे असून त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना २७ ऑगस्ट पर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. एका युवतीने या प्रकरणी तक्रार केल्यावर हा प्रकार उघडकीस आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सातारा कराड येथील टेंबू गावात रेखा सकट ही महिला आई चॅरिटेबल ट्रस्ट अंतर्गत गावात निराधार आश्रम चालवते. या अनाथ आश्रमात अनेक अनाथ मुली व महिलांची भरती केली जात होती. मात्र आश्रमाची संचालिका असलेली रेखा सकट आश्रमतील महिलांना व मुलीना वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडत होती. मात्र, हा प्रकार सहन न झाल्याने अनाथाश्रमामध्ये आलेल्या एका अनाथ मुलीने या प्रकाराची माहिती थेट पोलिसांना दिली. पोलिसांनी या प्रकरणी तातडीने कारवाई करत रेखा सकट व तिचा प्रियकर वाल्मिकी माने या दोघांना रंगे हात पकडले. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता दोघांना २७ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.

घटनेशी संबंधित ऑडिओ व्हिडिओ क्लिप व्हायरल

या प्रकरणाशी संबंधित एक ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिप सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. यात आरोपी रेखा सकट ही अनाथाश्रमातील मुलांकडून स्वत:चे पाय दाबून सेवा करून घेत आहे. तसेच त्यांना इतर कामे देखील सांगितले जात आहेत. ज्यांनी तिचं ऐकले नाही अशा मुलींना मारहाण देखील केली जात आहे. तसेच एका मतिमंद मुलीवर देखील अत्याचार झाल्याच ऑडिओ क्लिपमध्ये असलेल्या सांभाषणावरून आढळून आले आहे. या प्रकरणी सातारा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या प्रकारात कोण कोण सहभागी आहेत याचा देखील तपास केला जात आहे. दरम्यान, या प्रकरणी गावात नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण असून कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. 

विभाग