Thane Sex racket : ठाण्यात परदेशी महिलांकडून सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; दलाल महिलेला अटक, तीन मुलींची सुटका
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Thane Sex racket : ठाण्यात परदेशी महिलांकडून सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; दलाल महिलेला अटक, तीन मुलींची सुटका

Thane Sex racket : ठाण्यात परदेशी महिलांकडून सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; दलाल महिलेला अटक, तीन मुलींची सुटका

Jun 24, 2024 09:08 AM IST

Thane Sex racket : ठाण्यात थायलंडच्या काही तरुणींकडून सेक्स रॅकेट चालवण्यात येत असल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी एका महिलेला अटक करण्यात आली आहे.

ठाण्यात परदेशी महिलांकडून सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; एका मुलीसाठी होत होता २५ हजारांचा सौद
ठाण्यात परदेशी महिलांकडून सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; एका मुलीसाठी होत होता २५ हजारांचा सौद (HT)

Thane Sex racket : ठाण्यात वागळे इस्टेट भागातील लुईसवाडीत सर्व्हिस रोडलगतच्या विटस् शरणम हॉटेलमध्ये काही विदेशी तरुणींकडून सेक्स रॅकेट चालवले जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. एका मुलीसाठी तब्बल २५ हजार रुपयांचा सौदा केला आजात होता. या सर्व तरुणी थायलंड येथील असून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. तर या प्रकरणी एका महिलेला अटक करण्यात आली आहे.

ठाण्यात वागळे इस्टेट जवळील विटस् शरणम हॉटेलमध्ये गैर प्रकार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार रविवारी पोलिसांनी या हॉटेलवर छापा टाकला. यावेळी येथे सुरू असलेला गैरप्रकार उघडकीस आला. हे सेक्स रॅकेट चलवणाऱ्या महिलेस ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. या दलाल महिलेला २५ जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले.

विटस् शरणम हॉटेलमध्ये थायलंड येथील तरुणींकडून वेश्या व्यवसाय करून घेत असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक चेतना चौधरी यांना मिळाली. त्यानुसार अतिरिक्त पोलिस आयुक्त डॉ. पंजाब उगले, उपायुक्त शिवराज पाटील यांनी दिलेल्या आदेशानुसार एएचटीसी कक्षाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक चेतना चौधरी व त्यांच्या पथकाने या हॉटेलमध्ये सापळा रचला. या हॉटेलमध्ये बनावट ग्राहक पाठवन्यात आले. त्यानुसार या ठिकाणी होणाऱ्या प्रकाराची खातर जमा करण्यात आली. एका सौद्यासाठी तब्बल २५ हजार रुपयांची मागणी आरोपी दलाल महिलेने केली. दरम्यान, ठरलेल्या नुसार दलाल महिलेले थायलंडच्या तीन मुलींना आणले. यावेळी पथकाने धाड टाकून त्यांना रंगेहात पकडले.

या महिलेच्या तातवडीतून ३० ते ३५ वयोगटातील थायलंडच्या तीन मुलींची सुटका करण्यात आली आहे. या प्रकरणी दलाल आरोपी महिलेविरुद्ध वागळे इस्टेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून तिला अटक करण्यात आली आहे.

पीडित महिला बाल सुधारगृहात

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या महिलांची मुंबईतील रेस्कू फाउंडेशन या महिला बाल सुधारगृहात ठेवले आहे. या महिला मुंबईतील जुहू भागात राहण्यास आहेत. त्या मुंबईत कोणाकडे थांबल्या होत्या का याचा पोलिस शोध घेत आहेत.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर