Pune Sex Racket : पुण्यात हायप्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; २ विदेशी मॉडेलसह एका अभिनेत्रीला अटक
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Sex Racket : पुण्यात हायप्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; २ विदेशी मॉडेलसह एका अभिनेत्रीला अटक

Pune Sex Racket : पुण्यात हायप्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; २ विदेशी मॉडेलसह एका अभिनेत्रीला अटक

Jan 17, 2024 07:40 PM IST

Pune Sex Racket News : पुण्यातील हायप्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात पुणे पोलिसांना यश आले आहे.

Pune Sex Racket Busted
Pune Sex Racket Busted (HT)

Pune Sex Racket Busted: पुण्यातील हायप्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात पुणे पोलिसांना यश आले आहे. पुणे पोलिसांनी वेश्याव्यवसायात गुंतलेली राजस्थानी अभिनेत्री आणि उझबेकिस्तानमधील दोन मॉडेल्सना ताब्यात घेतले. मिळालेल्या माहितीनुसारस, पुणे पोलिसांच्या सुरक्षा विभागाने पुण्यातील विमान नगर भागात ही कारवाई केली.परदेशातून हे सेक्स रॅकेट चालवले जात असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेने पुणे परिसरात एकच खळबळ माजली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील विमान नगर परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून ऑनलाइन वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पुणे पोलिसांना मिळाली. त्यानंतर पुणे पोलिसांनी सापळा रचून दोन उझबेक मॉडेलसह एका राजस्थानी अभिनेत्रीला ताब्यात घेतले आहे. उझबेकिस्तानमधील दोन मॉडेल ऑनलाइन वेश्या व्यवसाय चालवत होत्या.

आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पुणे पोलिसांनी ऑनलाइन सेक्स रॅकेट चालवणाऱ्या आरोपींचा शोध सुरू केला आहे. काही दिवसांपूर्वी गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेला व्यवसायचा भांडाफोड केला होता. त्यावेळी चार मुलींची सुटका करण्यात आली होती.

पुण्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारींच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. गुन्हेगारींना आळा घालण्यासाठी पुणे पोलीसांनीही कारवाईला सुरुवात केली आहे. रात्री गस्त घालणे, माहिती मिळताच छापे टाकणे, अशा वेगवेगळ्या पद्धतीने पुणे पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे. अनेक अवैध धंद्यांवरही कारवाई केली जात आहे. मात्र, तरीही पुण्यात अशा घटना थांबायचे नाव घेत नाहीत.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर