मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  मुंबईतील म्हाडा कॉलनीतील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; तीन तरुणींची सुटका

मुंबईतील म्हाडा कॉलनीतील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; तीन तरुणींची सुटका

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Dec 11, 2023 09:10 PM IST

Mumbai Sex Racket Busted : मुंबईतील विरारमधील एका म्हाडा वसाहतीत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले आहे. या इमारतीतील एका खोलीतून तीन मुलींची सुटका करत एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.

सांकेतिक छायाचित्र
सांकेतिक छायाचित्र

Mumbai Mhada sex Racket : विरारमधील म्हाडाच्या एका वसाहतीत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. घरांची व सोडतीची चर्चा होत असलेल्या म्हाडाच्या वसाहतीत सेक्स रॅकेट सुरू असल्याचा प्रकार समोर आल्याने सर्वांना धक्का बसला आहे. नालासोपारा अनैतिक मानवी तस्करी शाखेच्या पोलिसांनी या सेक्स रॅकेटचा भांडाफोड करत एकाला अटक केली असून २ बांगलादेशी तरुणींसह एका अल्पवयीन मुलीची सुटका करण्यात आली आहे.

आरोपी अशोक दास (५४) असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. विरार पश्चिमेला असणाऱ्या म्हाडाच्या एका मोठ्या वसाहतीत हा प्रकार सुरु होता. पोलिसांनी एका दलालाला अटक केली आहे. तो बांगलादेशी नागरिक आहे. त्याचे दोन साथीदार पोलीस छाप्याचा सुगावा लागताच पळ काढण्यात यशस्वी झाले. त्यांचा शोध घेतला जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विरारच्या म्हाडा वसाहतीच्या डी-७ अपार्टमेंटमधील एका खोलीत सेक्स रॅकेट सुरु असल्याची माहिती मिळाली होती. येथे आरोपींनी बांगलादेशातून अल्पवयीन मुलींची फसवणूक करून त्यांना देहव्यापारासाठी मुंबईत आणले होते. विरारमधील या फ्लॅटमध्ये तो या मुलींना ठेवून त्यानंतर ते त्यांना वेश्या व्यवसायासाठी ग्रँट रोड परिसरातील रेड लाईट भागामध्ये पाठवत होता.

तीन आरोपींनी गेल्या दोन वर्षात ३०० हून अधिक मुलींना फसवून बांगलादेशातून मुंबईत आणलं होतं. याप्रकरणी अर्नाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

WhatsApp channel

विभाग