Pune Water Cut : पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! गुरुवारी शुक्रवारी 'या' भागात पाणी पुरवठा राहणार बंद! पाणी जपून वापरा
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Water Cut : पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! गुरुवारी शुक्रवारी 'या' भागात पाणी पुरवठा राहणार बंद! पाणी जपून वापरा

Pune Water Cut : पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! गुरुवारी शुक्रवारी 'या' भागात पाणी पुरवठा राहणार बंद! पाणी जपून वापरा

May 29, 2024 06:54 AM IST

Pune Water Cut : पुण्यात विविध पाइप लाइन दुरुस्ती आणि देखभाल दुरुस्तीचे कामे हाती घेण्यात आली असून यामुळे गुरुवारी पुण्यातील काही भागात पाणीपुरवठा हा बंद राहणार आहे. शुक्रवारी कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे.

गुरुवारी पुण्यातील काही भागात पाणीपुरवठा हा बंद राहणार आहे.
गुरुवारी पुण्यातील काही भागात पाणीपुरवठा हा बंद राहणार आहे.

Pune Water Cut : पुण्यात विविध पाइप लाइन दुरुस्ती आणि देखभाल दुरुस्तीचे कामे हाती घेण्यात आली असून यामुले गुरुवारी पुण्यातील काही भागात पाणीपुरवठा हा बंद राहणार आहे. शुक्रवारी कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. नागरिकांनी या काळात पाणी जपून वापरावे असे आवाहन पुणे महानगर पालिकेच्या पाणी पुरवठा विभागातर्फे करण्यात आले आहे.

Nawaz Sharif : होय, १९९९ मध्ये पाकिस्तानने भारतासोबत शांतता कराराचे उल्लंघन केले, नवाझ शरीफ यांची कबुली

पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी (दि ३०) वडगाव जलकेंद्र व राजीव गांधी पंपिंग येथील विद्युत आणि पंपींग विषयक व स्थापत्य विषयक तातडीचे देखभाल दुरुस्ती व अत्यावश्यक देखभाल दुरूस्तीचे काम हाती घेतले जाणार आहे. तर धनकवडी येथील शिवशंकर चौक येथे कलवर्टचे काम सुरु आहे. या कामामध्ये अडथळा ठरणारी ७९६ मीमी व्यासाची पाईप लाईन बदलण्याचे नियोजन आहे. त्यामुळे वरील ठिकाणी पंपींग यंत्रणा बंद ठेवावी लागणार असल्याने या अंतर्गत येणाऱ्या भागात पाणी पुरवठा हा गुरुवारी बंद राहणार आहे.

Maharashtra Weather Update : विदर्भ, मराठवाड्यात जिवाची लाही लाही! तापमान कमी होईना;'या' जिल्ह्यांना हीट वेव्हचा अलर्ट

तर शुक्रवारी (दि ३१) सकाळी उशीरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. तरी सर्व नागरिकांनी याबाबत नोंद घेऊन पाण्याचा साठा करावा व पाण्याचे योग्य नियोजन करावे असे आवाहन पालिकेच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.

हाय गर्मी! भाषण सुरू असतानाच राहुल गांधींनी पाण्याची बाटली डोक्यावर ओतली, पाहा VIDEO

या भागात पाणी पुरवठा राहणार बंद

वडगाव जलकेंद्र परीसर हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगावपठार, दत्तनगर, धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ परीसर, कोंढवा बुद्रुक आंबेगाव खुर्द, आंबेगाव बुद्रुक, येवलेवाडी, सहकारनगर भाग २ वरील भाग, आंबेडकरनगर, टिळकनगर परिसर, दाते बस स्टॉप परिसर, इत्यादी.

राजीव गांधी पंपिंग :- सच्चाई माता टाकी, संतोष नगर, दत्तनगर, आंबेगाव बुद्रुक, आंबेगाव खुर्द, सुंदा माता नगर, वंडर सिटी, मोरेबाग, श्रीहरी टाकी, बालाजी नगर, पवार हॉस्पिटल परिसर, केदारेश्वर टाकी, सुखसागर नगर मधील भाग क्रमांक एक व दोन, राजेश सोसायटी, उत्कर्ष सोसायटी, सुंदरबन सोसायटी, शेलार मळा, कात्रज गावठाण, भारत नगर, दत्तनगर, जुना प्रभाग 38 मधील वरखडे नगर तसेच संपूर्ण जुना प्रभाग 41 व येवलेवाडी परिसर इ.

Whats_app_banner
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर