मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune water supply news : पुणेकरांनो, पाणी जपून वापरा! शुक्रवारी संपूर्ण शहरात पाणीपुरवठा बंद राहणार

Pune water supply news : पुणेकरांनो, पाणी जपून वापरा! शुक्रवारी संपूर्ण शहरात पाणीपुरवठा बंद राहणार

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
May 22, 2024 09:51 AM IST

Pune Water Cut on Friday : पुण्यात देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी पुणे पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने विविध कामे हाती घेतली असून यामुळे शुक्रवारी पुण्यात अनेक भगत पाणी पुरवठा बंद राहणार आहे.

पुणेकरांनो पाणी जपून वापरा ! शुक्रवारी संपूर्ण शहरात पाणी पुरवठा राहणार बंद
पुणेकरांनो पाणी जपून वापरा ! शुक्रवारी संपूर्ण शहरात पाणी पुरवठा राहणार बंद

Pune Water Cut on Friday : पुण्यात देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी पुणे पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने विविध कामे हाती घेतली असून यामुळे संपूर्ण पुण्यात शुक्रवारी पाणी पुरवठा बंद राहणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

शाहरुख खानची लाडकी लेक झाली २४ वर्षांची! 'बेस्ट फ्रेंड' अनन्या पांडे, शनाया कपूरने सुहानाला दिल्या खास शुभेच्छा!

पुणे महानगर पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिलेल्या माहितीनुसार पर्वती टाकी परिसर, वारजे जलकेंद्र अखत्यारीतील चांदणी चौक टाकी, गांधी भवन टाकी परिसर, एस.एन.डी.टी. (एम.एल. आर.) टाकी परिसर तसेच एस.एन.डी.टी. (एच.एल.आर.) टाकी परिसर व चतुःश्रृंगी टाकी परिसर तसेच लष्कर जलकेंद्र रॉ वॉटर पंपिंग, होळकर जलकेंद्र व चिखली जलशुद्धीकरण केंद्र येथील विद्युत / पंपींग विषयक व स्थापत्य विषयक तातडीचे देखभाल दुरुस्तीचे कामे हाती घेतली जाणार आहेत. त्यामुळे संपुर्ण पुणे शहराचा पाणी पुरवठा हा बंद राहणार आहे तर दुसऱ्या दिवशी शनिवारी पाणी पुरवठा हा कमी दाबाने होणार आहे.

Boat sank in Bhima : वादळामुळे भीमा नदीत उजनी धरणात बोट उलटली; ६ जण बुडाले, एकाने पोहून वाचवले प्राण

पाणी विभागाचे प्रमुख नंदकुमार जगताप यांनी एक प्रेस नोट जारी करून म्हटले आहे की, "पुणे महानगरपालिकेने (पीएमसी) काही पाण्याच्या टाक्या आणि जलशुद्धीकरण केंद्रांवर नागरी आणि विद्युत कामांचे नियोजन केले असल्याने शुक्रवारी अनेक भागांना पाणीपुरवठा होणार नाही, असे जगताप म्हणाले.

या भागात राहणार पाणी पुरवठा बंद

पुणे शहराच्या मध्यवती भागातील पेठासह गोखलेनगर, औंध, बोपोडी, पुणे विद्यापिठ, लॉ कॉलेज रोड, महाबळेश्वर हॉटेल पर्यंत भागेर रोड, बीएमसीसी कॉलेज रोड, आयसीएस कॉल्स भोसलेनगर, सेनापती बापट रोड, भांडारकर रोड, प्रभात रोड, पौड रोड शीला विहार कॉलनी, अद्वैत सोसा, मयुर डी. पी. रस्त्याची डावी बाजु, कर्वेरोड झाला सोसायटी ते शिवाजी पुतळ्या पर्यंतचा भाग, दशभूजा गणपती ते नळस्टॉप, पाषाण साठवण टाकी, भूगाव रोड परिसर, कोकाटे वस्ती, सेंटीन हिल सोसायटी, मधुवन सोसायटी, संपूर्ण बावधन परिसर, उजवी भुसारी कॉलनी व डावी भुसारी कॉलनी व चढावरील भाग, चिंतामणी सोसायटी, गुरुगणेश नगर, सुरज नगर, सागर कॉलनी, भारतीनगर, बावधन परिसर, सारथीशिल्प सोसायटी, पूजा पार्क, शांतीबन सोसायटी परिसर, डुक्कर खिंडीकडील भाग, शास्त्रीनगर, न्यू लक्ष्मीनगर, परमहंस नगर, पूर्ण पाषाण, सोमेश्वरवाडी, सुतारवाडी, निम्हणमळा, लम्हाणतांडा, मोहननगर, सुस रोड, गांधी भवन टाकी परिसर, पॅनकार्ड क्लब जीएसआर टाकी परिसर, वारजे जलकेंद्र लगत जीएसआर टाकी परिसर, चतुः श्रृंगी टाकी परीसर पाषाण पंपिंग व सुस गोल टाकी परिसर, जुने वारजे जलकेंद्र भाग, लष्कर जलकेंद्र भाग, नवीन व जुने होळकर जलकेंद्र अंतर्गत असणा०या भागाचा पाणी पुरवठा बंद असणार आहे.

टी-२० वर्ल्डकप २०२४

विभाग