Nashik Crime : नाशिक हादरलं! झेंडावंदन करण्यासाठी गेलेल्या चिमुकल्यासोबत भयंकर कांड; हत्या करून झुडपात फेकला मृतदेह-seven year old boy killed in vadner bhairav chandwad nashik crime news ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Nashik Crime : नाशिक हादरलं! झेंडावंदन करण्यासाठी गेलेल्या चिमुकल्यासोबत भयंकर कांड; हत्या करून झुडपात फेकला मृतदेह

Nashik Crime : नाशिक हादरलं! झेंडावंदन करण्यासाठी गेलेल्या चिमुकल्यासोबत भयंकर कांड; हत्या करून झुडपात फेकला मृतदेह

Aug 18, 2024 11:04 AM IST

Nashik Crime News : नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील (Chandwad Taluka) वडनेर भैरव (vadner Bhairav) परिसरात गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या मुलाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे.

नाशिक हादरलं! झेंडावंदन करण्यासाठी गेलेल्या चिमुकल्यासोबत भयंकर कांड; हत्या करून झुडपात फेकला मृतदेह
नाशिक हादरलं! झेंडावंदन करण्यासाठी गेलेल्या चिमुकल्यासोबत भयंकर कांड; हत्या करून झुडपात फेकला मृतदेह

Nashik Crime News नाशिक जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. झेंडावंदनासाठी गेलेला व तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका ७ वर्षीय चिमूकल्याचा मृतदेह झुडपात आढळला आहे. या मुलाचे अपहरण करून त्याची हत्या करण्यात आली आहे. हत्येपूर्वी त्याच्यावर अत्याचार केल्याचा संशय आहे. या प्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. ही घटना नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील वडनेर भैरव येथे घडली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

या घटनेचे वृत्त असे की, नाशिकच्या चांदवड तालूक्यातील वडनेर-भैरव येथे परप्रांतीय असलेले व मोलमजुरी करणारे संतोष भगत हे त्यांच्या कुटुंबासोबत या ठिकाणी राहतात. त्यांना सात वर्षांचा मुलगा आहे. तो तीन दिवसांपूर्वी शाळेत झेंडावंदन करण्यासाठी गेला होता. यावेळी एका व्यक्तीने त्याचे अपहरण केले होते. दरम्यान, मुलगा घरी परत आला नअसल्याने तो बेपत्ता झाल्याची तक्रार संतोष भगत यांनी पोलीस ठाण्यात दिली. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला होता. दरम्यान, आज या चिमूकल्याचा मृतदेह झाडाझुडपात खराब अवस्थेत आढळून आला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदन करण्यासाठी तो पाठवण्यात आला आहे. प्राथमिक अहवाल आल्यावर मुलाची हत्या कशी करण्यात आली हे समजणार आहे.

अपहरण करून अत्याचार करून केला खून

खून झालेलं मुलगा हा स्वातंत्र्य दिनानिमित्त झेंडा वंदनासाठी शाळेत गेला होता. त्या दिवसांपासून तो बेपत्ता होता. पोलिस त्याचा शोध घेत होते. या मुलाचा मृतदेह गावाजवळ असलेल्या शाळेच्या मैदानाजवळील झूडपात सापडला. दरम्यान, हा मुलगा एका तरुणासोबत जात असल्याचं सीसीटीव्हीत कैद झाले आहे. पोलिसांनी त्या तरुणाला ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी केली जात आहे.

पोलिसांनी घेतली श्वानपथकाची मदत

पोलिसांनी सिसिटीव्ही तपासले असता मुलगा हा एका तरुणासोबत जात असल्याचं निदर्शनास आलं. त्यानंतर पोलिसांनी श्वान पथकाद्वारे मुलाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मुलाचा मृतदेह शाळे जवळील मोकळ्या जागेत झुडपात आढळला. या घटनेचा ग्रामस्थांनी निषेध केला आहे. तसेच आरोपीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या घटनेच्या निषेधार्थ गावात बंद देखील पुकारण्यात आला आहे.

विभाग