एकाच दिवशी सात जणांनी आत्महत्या केल्याने पिंपरी चिंचवड हादरलं आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत सर्व आत्महत्या झाल्या आहेत. शहरातील विविध ठिकाणी एकाच दिवशी सात जणांनी आपले आयुष्य संपवल्याने एकच खळबळ माजली आहे. यातील ६ जणांनी गळफास घेऊन आपले जीवन संपवले तर एकाने इमारतीच्या आठव्या मजल्यावरून उडी मारून मृत्यूला कवटाळले.
पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड शहरातील पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत या घटना घडल्या आहेत. या सर्व घटना २७ जानेवारी रोजी घडल्याचं सांगितले जात आहे. शहरात वाढत्या गुन्हेगारी बरोबरच वाढते आत्महत्यांचे सत्र चिंतेचे कारण बनले आहे. या सर्व आत्महत्या प्रकरणांचा तपास पिंपरी चिंचवडमधील पोलीस करत आहेत.
२७ जानेवारी दिवशी पिंपरी चिंडवडमधील गौरव ज्ञानेश्वर आगम (वय २८ वर्ष), प्रसाद संजय अवचट (वय ३१ वर्ष), विकास रामदास मुरगड (वय ३५ वर्ष), मनाप्पा सोमल्या चव्हाण (वय ५२ वर्ष), नवनाथ भगवान पवार (वय ४६ वर्ष), सुवर्णा श्रीराम पवार (वय ३६ वर्ष) आणि दिनेश सुरेश लोखंडे (वय ४० वर्ष) यांनी आत्महत्या केल्याची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे आत्महत्या करणारे वेगवेगळ्या वयोगटातील आहेत.
गौरव ज्ञानेश्वर अगम या तरुणाने घरातील खिडकीच्या ग्रीलला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतला. पुनावळे भागात राहणाऱ्या प्रसाद संजय अवचट या तरुणाने घरातच गळफास घेऊन जीवन संपवले. भोसरी परिसरात विकास रामदास मुरगुंड या ३५ वर्षांच्या तरुणाने आत्महत्या केली. मनाप्पा सोमल्ल्या चव्हाण या ५२ वर्षांच्या नागरिकाने मुळशी तालुक्यातील नेरे गावात लिंबाच्या झाडाला डोक्याचा फटका बांधून गळफास घेतला.
नवनाथ भगवान पवार यांनी थेरगावातील राहत्या घरी रात्रीच्या वेळी गळफास घेतला. जुनी सांगवी परिसरात ३६ वर्षांच्या सुवर्णा श्रीराम पवार या महिलेने साडीच्या सहाय्याने पंख्याला गळफास घेतला. तर चिखली परिसरात इमारतीच्या आठव्या मजल्यावरून उडी मारून ४० वर्षांच्या दिनेश सुरेश लोखंडे यांनी आपले जीवन संपवले.
संबंधित बातम्या