महाराष्ट्र विधानपरिषदेसाठी राज्यपाल नामनियुक्त सदस्य हेमंत श्रीराम पाटील, पंकज छगन भुजबळ, मनीषा कायंदे, इद्रिस इलियास नाईकवाडी, विक्रांत पाटील, धर्मगुरू बाबुसिंग महाराज राठोड, चित्रा किशोर वाघ यांना विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी सदस्यत्वाची शपथ दिली.
चित्रा वाघ: महिलांच्या प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेणाऱ्या नेता म्हणून भाजपच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांची ओळख आहे.
इदेरिस नायकवडी: अजित पवार गटाकडून सांगलीचे माजी नगराध्यक्ष इदेरिस नायकवडी यांना संधी देण्यात आली.
धर्मगुरू बाबुसिंग महाराज राठोड: भाजपकडून बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या पोहरादेवीच्या गादीचे गुरु बाबुसिंग महाराज राठोड यांना आमदारकी देण्यात आली.
पंकज भुजबळ: छगन भुजबळ यांचे चिरंजीव पंकज भुजबळ यांना अजित पवारांकडून संधी देण्यात आली. नांदगावमधून दोन वेळा विधानसभेवर गेले आहेत.
विक्रांत पाटील: भाजपचे प्रदेश सरचिटणीस आणि पनवेलचे माजी उपमहापौर विक्रांत पाटील यांना संधी मिळाली आहे.