मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Eknath khadse : शरद पवारांचा ऋणी, पण.., एकनाथ खडसेंनी जयंत पाटलांशी चर्चा करून जाहीर केला मोठा निर्णय

Eknath khadse : शरद पवारांचा ऋणी, पण.., एकनाथ खडसेंनी जयंत पाटलांशी चर्चा करून जाहीर केला मोठा निर्णय

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Apr 07, 2024 04:37 PM IST

Eknath Khadse : एकनाथ खडसे यांनी आज पत्रकार परिषद घेत आपल्या पुढील राजकीय वाटचालीची घोषणा केली. खडसे म्हणजे की, येत्या १५ दिसात मी भाजपमध्ये परत जात आहे.

एकनाथ खडसेंनी पत्रकार परिषदेत जाहीर केला मोठा निर्णय
एकनाथ खडसेंनी पत्रकार परिषदेत जाहीर केला मोठा निर्णय

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि विधानपरिषद आमदार एकनाथ खडसे (Eknath khadse) पुन्हा स्वगृही म्हणजे भाजपमध्ये परतत असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र आता एकनाथ खडसेंनी आपण भाजपमध्ये जात असल्याचे स्पष्ट केले आहे. एकनाथ खडसे यांनी आज पत्रकार परिषद घेत आपल्या पुढील राजकीय वाटचालीची घोषणा केली. खडसे म्हणजे की, येत्या १५ दिसात मी भाजपमध्ये परत जात आहे.

ट्रेंडिंग न्यूज

एकनाथ खडसे म्हणाले मी संकटात असताना शरद पवारांनी (sharad pawar) मला साथ दिली. मला विधान परिषदेवर संधी दिली. शरद पवारांचा मी ऋणी आहे मात्र आता मी भाजपमध्ये परतण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपमध्ये पुन्हा परत जाण्याचा निर्णय घेण्यापूर्वी मी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी चर्चा केली होती. त्यांनी भाजपमध्ये जाण्याची कारणे सांगितली होती. त्यांनी अनुकूलता दर्शवल्यानंतर मी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचा दावा एकनाथ खडसे यांनी केला आहे.

काही दिवसांपूर्वी एकनाथ खडसे यांनी दिल्ली दौरा केला होता. मात्र आपण न्यायालयातील केसची तारीख असल्यामुळे दिल्लीला गेल्याचे खडसे यांनी सांगितले होते. मात्र आता त्यांनी दिल्लीत त्यावेळी घडलेल्या घडामोडीबद्दल सांगितलं आहे. एकनाथ खडसे म्हणाले की, गेल्या अनेक महिन्यांपासून माझी भाजपमधील जुन्या नेत्यांशी आणि पदाधिकाऱ्यांसोबत भाजप प्रवेशाबाबत चर्चा सुरू होती. भाजपमधील वरिष्ठ नेत्यांनं म्हणणं होतं की मी पुन्हा भाजपमध्ये यायला हवं. मात्र मी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेण्याच्या मानसिकतेत नसल्याचं त्यांना कळवलं होतं. मात्र काही दिवसांपूर्वी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतली व त्यांच्याकडे भाजपमध्ये पुन्हा प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार याच महिन्यात भाजप प्रवेश होईल, असे खडसे यांनी सांगितले.

खडसेंचा पक्षप्रवेश दिल्लीत -

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली असून अनेक केंद्रीय नेते व मंत्र्यांचे महाराष्ट्रात दौरे होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या काही दिवसात विदर्भाच्या दौऱ्यावर येणार आहे. त्यामुळे त्यांच्या उपस्थितीत एकनाथ खडसे यांचा भाजप प्रवेश होईल, अशी चर्चा सुरू होती. मात्र खडसे यांनी पत्रकार परिषदेत खुलासा केला की, माझा पक्षप्रवेश महाराष्ट्रात होणार नसून दिल्लीत होणार आहे. केंद्रीय नेतृत्वाकडून पक्षप्रवेशाची वेळ दिली जाणार असून त्यानंतर मी दिल्लीत जाऊन भाजपमध्ये प्रवेश करेन. भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी मी कोणत्याही अटी-शर्थी ठेवल्या नसल्याचे खडसे म्हणाले. माझी जी नाराजी होती, ती दूर झाली असल्याचंही एकनाथ खडसे म्हणाले.

दरम्यान एकनाथ खडसे भाजपमध्ये परतत असले तरी त्यांच्या कन्या व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे राष्ट्रवादीतच राहणार आहेत. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांनी आपली पुढील राजकीय भूमिका स्पष्ट करताना शरद पवारांसोबतच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

IPL_Entry_Point