निवासी डॉक्टरांच्या स्टायपेंडमध्ये घसघशीत वाढ, प्रतिमहिना मिळणार ८५ हजार!
resident doctors stipend : राज्य वैद्यकीय शिक्षण मंडळाने निवासी डॉक्टरांच्या स्टायपेंडमध्ये घसघशीत वाढ करण्याचा निर्णय घेतला.
राज्यातील सरकारी निवासी डॉक्टरांना खुशखबर आहे. राज्य वैद्यकीय शिक्षण मंडळाने निवासी डॉक्टरांच्या स्टायपेंडमध्ये घसघशीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारी निवासी डॉक्टरांचा स्टायपेंट प्रतिमहिना ८५,००० रुपये होणार आहे. या निर्णयावर छत्रपती संभाजीनगरमध्ये होणाऱ्या कॅबिनेट बैठकीत शिक्कामोर्तब केले जाण्याची शक्यता आहे.
ट्रेंडिंग न्यूज
सरकारमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, सध्या राज्यातील वरिष्ठ निवासी डॉक्टरांना ७० ते ८० हजार रुपये स्टायपेंड दिला जातो. हा स्टायपेंड ते कोणत्या शहरात व मेडिकल कॉलेजमध्ये सेवा देतात, यावरून ठरवला जातो. मेडिकल क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी स्टायपेंटसाठी आंदेलन केले होते. त्यानुसारराज्य सरकारने निर्णय घेतला आहे की, सर्व वरिष्ठ निवास डॉक्टरांना एकसमान ८५ हजार रुपये प्रति महिना स्टायपेंड दिला जाईल.
२०२० मध्ये ठाकरे सरकारने सरकारी महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांना दरमहा १० हजार रुपये स्टायपेंड वाढीचा निर्णय घेतला होता. मात्र, या निर्णयात खासगी वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांना वगळण्यात आले होते.
यावर्षी एप्रिलमध्ये शरद पवारांच्या पुढाकाराने मुंबई महानगरपालिकेच्या दवाखान्यात गेली कित्येक वर्षे इंटर्नशिप करणार्या निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतन ५० हजार रुपये केले होते. मागील दहा ते पंधरा वर्षापासून मुंबई महानगरपालिकेच्या दवाखान्यात इंटर्नशिप करणार्या निवासी डॉक्टर विद्यार्थ्यांना फक्त १५ हजार एवढेच विद्यावेतन देण्यात येत होते. त्यामध्ये वाढ करून ५० हजार रुपये केले गेले.
विभाग