ज्येष्ठ पत्रकार वोल्गा टेलिस यांना यंदाचा दिनू रणदिवे स्मृती पुरस्कार जाहीर-senior journalist volga teles to honor with dinu randive memorial award ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  ज्येष्ठ पत्रकार वोल्गा टेलिस यांना यंदाचा दिनू रणदिवे स्मृती पुरस्कार जाहीर

ज्येष्ठ पत्रकार वोल्गा टेलिस यांना यंदाचा दिनू रणदिवे स्मृती पुरस्कार जाहीर

Jun 12, 2023 06:37 PM IST

Dinu Randive Memorial Award : दिनू रणदिवे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दरवर्षी दिला जाणारा ‘पत्रकार दिनू रणदिवे स्मृती पुरस्कार’ यंदा ज्येष्ठ पत्रकार वोल्गा टेलिस यांना जाहीर झाला आहे.

वोल्गा टेलिस यांना यंदाचा दिनू रणदिवे स्मृती पुरस्कार जाहीर
वोल्गा टेलिस यांना यंदाचा दिनू रणदिवे स्मृती पुरस्कार जाहीर

मुंबई - ख्यातनाम पत्रकार, स्वातंत्र्यसैनिक, संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनातील एक आघाडीचे शिलेदार आणि भारताच्या समाजवादी चळवळीतील एक ध्येयवादी कार्यकर्ते दिवंगत दिनू रणदिवे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दरवर्षी दिला जाणारा ‘पत्रकार दिनू रणदिवे स्मृती पुरस्कार’ यंदा ज्येष्ठ पत्रकार वोल्गा टेलिस यांना जाहीर झाला आहे. 'पत्रकार दिनू रणदिवे स्मृती पारितोषिक समितीतर्फे येत्या १६ जून २०२३ रोजी मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात सायंकाळी ५.३० वाजता हा पुरस्कार वितरण केला जाणार आहे.

या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ पत्रकार,राज्यसभा सदस्य कुमार केतकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्यसभेचे माजी सदस्य डॉ. भालचंद्र मुणगेकर असतील.

ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांचे दि. १६ जून,२०२० रोजी निधन झाले. त्यांच्या अनेकविध कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वृत्तपत्र क्षेत्रात लक्षणीय कामगिरी करणाऱ्या एका ज्येष्ठ पत्रकाराला प्रतिवर्षी रुपये २५,००० रोख आणि सन्मानचिन्ह असा पारितोषिकाने सन्मानित करण्यात येते.

२०२१ साली पहिला पुरस्कार जेष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक प्रताप आसबे यांना तर २०२२ साली ज्येष्ठ पत्रकार अनंत बागाईतकर यांना ‘पत्रकार दिनू रणदिवे स्मृती पुरस्कार’ प्रदान करण्यात आला होता. यंदा पुरस्काराचे तिसरे वर्ष आहे. २०२३ चा पुरस्कार ओल्गा टेल्लिस यांना देण्यात यावा असे, पुरस्कार समितीच्या वतीने एकमताने ठरवण्यात आले.

पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष माजी राज्यसभा सदस्य डॉ. भालचंद्र मुणगेकर हे असून प्रेस क्लबचे अध्यक्ष गुरबीर सिंग, प्रकाश महाडिक आणि पत्रकार हारीस शेख हे निवड समितीचे सदस्य आहेत.

 

ओल्गा टेलिस यांचा संक्षिप्त परिचय -

ओल्गा टेलिस या गेली पाच दशकाहून अधिक काळ मुंबईत पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. साप्ताहिक'संडे'पत्रिकेच्या मुंबई प्रतिनिधी,ऑब्झर्वर ऑफ बिझनेस अँड पॉलिटिक्स वर्तमान पत्रात बिझनेस विषयाच्या पत्रकार, ‘ब्लिट्झ’ साप्ताहिकाच्या स्तंभलेखिका आणि ‘एशियन एज’ सारख्या प्रतिष्ठित वर्तमानपत्राच्या मुंबईतील निवासी संपादिका अशा विविध महत्वाच्या पदांवर काम करत असताना पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रदिर्घ काळ त्यांच्या नावाचा कायम दबदबा राहिलेला आहे.

 

विभाग