Kiran Thakur Passes Away: ज्येष्ठ पत्रकार डॉ. किरण ठाकूर यांचे निधन, वयाच्या ७७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Kiran Thakur Passes Away: ज्येष्ठ पत्रकार डॉ. किरण ठाकूर यांचे निधन, वयाच्या ७७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Kiran Thakur Passes Away: ज्येष्ठ पत्रकार डॉ. किरण ठाकूर यांचे निधन, वयाच्या ७७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Dec 28, 2024 12:08 PM IST

Kiran Thakur Dies At 77: ज्येष्ठ पत्रकार डॉ.किरण ठाकूर यांचे आज पहाटे निधन झाले. वयाच्या ७७ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली.

ज्येष्ठ पत्रकार डॉ. किरण ठाकूर यांचे निधन
ज्येष्ठ पत्रकार डॉ. किरण ठाकूर यांचे निधन

Kiran Thakur Death: ज्येष्ठ पत्रकार, पुणे श्रमिक पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागाचे माजी विभागप्रमुख डॉ. किरण ठाकुर यांचे आज पहाटे निधन झाले. वयाच्या ७७ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. डॉ. किरण ठाकूर यांच्या इच्छेनुसार देहदान करण्यात येणार असल्याने त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार नाहीत. त्यानी पत्रकार प्रतिष्ठानच्या स्थापनेत आणि पत्रकार भवनाच्या इमारतीच्या उभारणीत मोठे योगदान दिले आहे.

डॉ. किरण ठाकूर यांनी सन २००१ ते २००७ या काळात विभागाचे प्रमुख म्हणून त्यांनी काम पाहिले. त्यांनी तीन दशकांहून अधिक काळ पत्रकारिता केली. पुणे डेलीमध्ये उपसंपादक आणि युनायटेड न्यूज ऑफ इंडिया या वृत्तसंस्थेत प्रतिनिधी म्हणून त्यांनी काम पाहिले. इंडियन पोस्ट आणि द ऑब्झर्वर ऑफ बिझनेस अँड पॉलिटिक्स या नियतकालिकांसाठीही त्यांनी काम केले.

डॉ. ठाकूर यांनी २००१ मध्ये अध्यापनाच्या क्षेत्रात प्रवेश केला. पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागात ते प्राध्यापक व विभागप्रमुख म्हणून रुजू झाले. या काळात विभागाच्या प्रगतीसाठी त्यांनी अनेक उपक्रम हाती घेतले आणि नव्या संशोधनांना चालना दिली. डॉ. ठाकूर यांनी भारतातील वृत्तपत्रांच्या वेब आवृत्त्या या विषयावर पीएचडी संशोधन केले. अनेक शोधनिबंधांबरोबरच न्यूजपेपर इंग्लिश, हँडबुक ऑन प्रिंट जर्नालिझम आदी पुस्तकांचे लेखनही त्यांनी केले.

२००७ मध्ये विभागातून निवृत्त झाल्यानंतर डॉ. ठाकूर यांनी अहमदाबाद येथील मुद्रा इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेशन अँड रिसर्च, तसेच फ्लेम आणि विश्वकर्मा विद्यापीठांमध्ये मानद प्राध्यापक म्हणून काम पाहिले.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर