मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  डॉ. माईसाहेब आंबेडकर यांच्या समर्पित जीवनावर २७ जानेवारी रोजी चर्चासत्र

डॉ. माईसाहेब आंबेडकर यांच्या समर्पित जीवनावर २७ जानेवारी रोजी चर्चासत्र

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Jan 22, 2023 12:39 PM IST

Seminar on Savita Ambedkar Biography : माईसाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचं औचित्य साधून त्यांच्या समर्पित जीवनावर एक चर्चासत्र आयोजित करण्यात आलं आहे.

Dr. Maisaheb Ambedkar
Dr. Maisaheb Ambedkar

My Life with Dr Ambedkar : डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या सुविद्य पत्नी डॉ. माईसाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या ' डॉ आंबेडकरांच्या सहवासात' या आत्मचरित्रपर ग्रंथाचा इंग्रजी अनुवादित ग्रंथ ( बाबासाहेब: माय लाईफ विथ डॉ आंबेडकर) पेंगविन पब्लिकेशननं नुकताच प्रकाशित केला आहे. येत्या शुक्रवारी २७ जानेवारी रोजी माईसाहेब आंबेडकर यांची जयंती असून त्यांच्या समर्पित जीवनावर मुंबईच्या फोर्ट - हुतात्मा चौक येथील ' किताबखाना' तर्फे एक चर्चासत्र आयोजित करण्यात आलं आहे. हा कार्यक्रम संध्याकाळी ५.३० वाजता किताबखाना इथं पार पडणार आहे.

या चर्चासत्राला माईसाहेब आंबेडकर यांच्या इंग्रजी आत्मचरित्र ग्रंथाचे लेखक, प्रख्यात अनुवादक नदीम खान हे स्वतः उपस्थित राहणार आहेत. तसेच डॉ आंबेडकर जीवन चरित्र व चळवळीचे संशोधक विजय सुरवाडे आणि ज्येष्ठ पत्रकार दिवाकर शेजवळ हे या चर्चासत्रात प्रमुख वक्ते आहेत. तर,टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स मधील प्रा. अवथी रामय्या हे या चर्चासत्राचं सूत्रसंचालन करणार आहेत.

डॉ माईसाहेब आंबेडकर यांच्या मराठी आत्मचरित्राची आता पाचवी आवृत्तीही प्रकाशनाच्या वाटेवर आहे. त्या ग्रंथाचा इंग्रजी अनुवाद प्रकाशित झाल्याने हे आत्मचरित्र जगभरात जाणार आहे. त्याचे अनुवादक नदीम खान यांनीच यापूर्वी विश्वास पाटील यांची 'पानिपत' आणि साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेल्या अवधूत डोंगरे यांच्या ' स्वतःला फालतू समजण्याची गोष्ट' या कादंबऱ्याचा अनुवाद केला आहे. त्यांचे आतापर्यंत डझनभर अनुवादित ग्रंथ प्रकाशित झाले आहेत.

IPL_Entry_Point

विभाग