Pune airport : लोहगाव विमानतळावर विमानाच्या शिडीवरून पडून सुरक्षा अधिकाऱ्याचा मृत्यू
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune airport : लोहगाव विमानतळावर विमानाच्या शिडीवरून पडून सुरक्षा अधिकाऱ्याचा मृत्यू

Pune airport : लोहगाव विमानतळावर विमानाच्या शिडीवरून पडून सुरक्षा अधिकाऱ्याचा मृत्यू

Jul 03, 2023 09:45 AM IST

Pune lohagaon airport : पुण्यातील लोहगाव विमानतळावर एक धक्कादायक घटना घडली. विमानातून प्रवासी उतरल्यानंतर विमानाची दारे बंद झाल्याची पाहणी करणारा सुरक्षा अधिकारी विमानाच्या शिडीवरुन खाली पडल्याने त्याचा मृत्यू झाला.

Pune lohagaon airport
Pune lohagaon airport

पुणे: पुण्यात लोहगाव विमानतळावर एक धक्कादायक घटना उघडकीस आलिया आहे. लोहगाव विमानतळावर विमानातून प्रवासी उतरल्यानंतर विमानाची दारे बंद झाली की नाही हे पाहताना एका सुरक्षा अधिकाऱ्याचा विमानाच्या शिडीवरून खाली पडून दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेप्रकरणी एअर एशिया विमान कंपनीच्या सुरक्षा व्यवस्थापकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

Monsoon Update : राज्यात पुढील पाच दिवस धो-धो बरसणार; कोकण मध्यमहाराष्ट्रात अतिमुळसाधार पावसाचा इशारा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विवियन अँथोनी डोमनिक (वय.३३, रा. लोहगाव, मूळ रा. तामिळनाडू) असे मृत्यूमुखी पडलेल्या सुरक्षा अधिकाऱ्याचे नाव आहे. सुरक्षेची पुरेशी काळजी न घेता दुघर्टनेस जबाबदार ठरल्या प्रकरणी एअरएशिया कंपनीचे सुरक्षा व्यवस्थापक एस. अजय हरिप्रसाद (रा.लोहगाव) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत विवियन डोमनिक यांची पत्नी अवली फ्रान्सकेन विवियन (वय २९, रा. तामिळनाडू ) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

या घटनेची हकिगत अशी की डोमनिक हे एयर एशियाचे विमान पुण्यात आल्यावर त्यातील प्रवाशी खाली उतरल्यावर विमानाचे दार ठीक लागले की नाही याची तपासणी करत होते. दरम्यान, पाहणी करत असताना अचानक ते शिडीवरून खाली पडले. यात ते गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. ही घटना १३ एप्रिल रोजी घडली होती. तामिळनाडूतील मूळगावी विवियन यांचा अंत्यविधी पार पडले. त्यानंतर त्यांची पत्नी अवली पुण्यात आल्या. त्यांनी नुकतीच विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. विमान कंपनीतील कर्मचाऱ्यांना सुरक्षाविषयक साधने न पुरविल्याने दुर्घटना घडल्याचे अवली यांनी फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक बी. बी. वाकडे तपास करत आहेत.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर