मोठी बातमी! देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षा व्यवस्थेत अचानक वाढ, समोर आले धक्कादायक कारण; वाचा
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  मोठी बातमी! देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षा व्यवस्थेत अचानक वाढ, समोर आले धक्कादायक कारण; वाचा

मोठी बातमी! देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षा व्यवस्थेत अचानक वाढ, समोर आले धक्कादायक कारण; वाचा

Nov 01, 2024 02:12 PM IST

devendra fadnavis security : गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. त्यांच्या जीवाला धोका असल्याने हे पाऊल उचलण्यात आले आहे.

देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षा व्यवस्थेत अचानक वाढ, समोर आले धक्कादायक कारण; वाचा
देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षा व्यवस्थेत अचानक वाढ, समोर आले धक्कादायक कारण; वाचा

devendra fadnavis security : राज्यात सध्या निवडणुकांचे वातावरण आहे. राजकीय पक्ष प्रचारात व्यस्त असतांना राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत अचानक मोठी वाढ करण्यात आली आहे. त्यांना झेड प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय सुरक्षा यंत्रणांनी घेतला आहे. फडणवीस यांच्या सुरक्षा व्यवस्थेत चार फोर्स वनचे चार अत्याधुनिक शस्त्रधारी कमांडो तैनात करण्यात येणार आहे.

राज्यात विधानसभा निवडणुकिचा प्रचाराचा ज्वर वाढला आहे. अर्ज भरण्याची मुदत संपली असून ४ तारखेनंतर निवडणूक रिंगणाचे चित्र स्पष्ट होणार आहे. राज्यात भाजपच्या प्रचाराची जबाबदारी ही उपूमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आहे. या धामधुमीत त्यांच्या जीवाला धोका असल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांना प्राप्त झाली आहे. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे. फडणवीस यांना सध्या झेड प्लस सुरक्षा देण्यात आली आहे. त्यात आला वाढ करण्यात आली आहे.

अशी असेल सुरक्षा व्यवस्था

देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षा व्यवस्थेत मोठा फेर बदल करण्यात आला आहे. सध्या फोर्स १ मधील अत्याधुनिक शस्त्रधारी असलेले ४ कमांडो फडणवीस यांच्या सुरक्षेत तैनात करण्यात येणार आहे. तर एकूण १८ जवान त्यांच्या सुरक्षा यंत्रणेत वाढवण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जीवाला धोका असल्याची माहिती एसआयडीच्या गोपनीय रिपोर्टपुढे आली आहे. त्यामुळे त्यांची सुरक्षा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांच्या सुरक्षेत देखील करण्यात आली होती वाढ 

आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांच्या सुरक्षेत देखील मोठी वाढ करण्यात आली होती. त्यांना पंतप्रधानांना देण्यात येणाऱ्या दर्जाची सुरक्षा देण्यात आली होती. मोहन भागवत यांच्या जीवाला देखील धोका असल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांना मिळाली होती. त्यानंतर त्यांच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली होती. 

Whats_app_banner
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर