मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune traffic update : लोकसभा निवडणुकीचा आज निकाल; पुण्यातील वाहतुकीत बदल, 'या' मार्गानं जाणं टाळा

Pune traffic update : लोकसभा निवडणुकीचा आज निकाल; पुण्यातील वाहतुकीत बदल, 'या' मार्गानं जाणं टाळा

Jun 04, 2024 08:43 AM IST

Traffic change in Pune koregaon Park area due to election : पुणे शहर आणि जिल्ह्यात आज लोकसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कोरेगाव पार्क येथील वाहतूक व्यवस्थेत आज बदल करण्यात आला आहे.

पुणे शहर आणि जिल्ह्यात आज लोकसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
पुणे शहर आणि जिल्ह्यात आज लोकसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Pune loksabha Election : पुण्यात आज चार लोकसभा मतदार संघासाठी मतमोजणी पार पडणार आहे. सकाळी ८ पासून मतमोजनी सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यात आणि जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तर कोरेगाव पार्क भागातील मतमोजणी केंद्र परिसरात आज पहाटे ६ पासून वाहतुकीत मोठा बदल करण्यात आला आहे. मतमोजणी पूर्ण झाल्यावर येथील वाहतूक ही पुर्ववत केली जाणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Election Results 2024 Live Updates : सत्तेची चावी कुणाच्या हाती? कोण जिंकणार, कोण हरणार ? आज होणार फैसला

पुण्यात आज शिरूर, बारामती, मावळ व पुणे शहर या चार लोकसभा मतदार संघासाठी मतमोजणी पार पडणार आहे. पुणे लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी कोरेगाव पार्क येथील अन्नधान्य महामंडळाच्या गोदामात होणार आहे. त्यामुळे या परिसरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. येथील वाहतुकीत मोठा बदल करण्यात आला आहे. तर ठीक ठिकाणी बॉम्बशोधक व नाशक पथक तैनात ठेवण्यात आले आहे. तर पुण्यातील व जिल्ह्यातील संवेदनशील भागात देखील बंदोबस्त वाढवण्यात आला असल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे.

Maharashtra Weather Update: लोकसभा मतमोजणीवर पावसाचे सावट; राज्यात आज अनेक जिल्ह्यात पावसाची शक्यता

पुणे व बारामती लोकसभा मतदार संघाच्या मतमोजणीसाठी येणाऱ्यांची संख्या पाहता वाहनतळाची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आलेली आहे. कस्तुरबा गांधी शाळा नॉर्थ मेन रोड, कोरेगाव पार्क येथे ६०० ते ७०० वाहनक्षमता असलेले दुचाकी वाहनतळ फक्त अधिकारी- कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध करुन देण्यात आले आहे. तर नागरिकांसाठी रोही व्हिला लॉन्स लेन नं.७, कोरेगाव पार्क येथे ६०० ते ७०० वाहनक्षमतेचे दुचाकी व चारचाकी वाहनतळ तर द पूना स्कूल ॲन्ड होम फॉर द ब्लाईंड ट्रस्ट, नॉर्थ मेन रोड, कोरेगाव पार्क येथे प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी व नागरिकांसाठी ८०० ते ९०० वाहनक्षमता असलेल्या चारचाकी वाहनतळाचे नियोजन करण्यात आले आहे. पुण्यात चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ४ उपायुक्त, ६ सहायक आयुक्त, १५० वरिष्ठ पोलीस निरीक्षक, १७० उपनिरीक्षक, १२०० पोलीस कर्मचारी, तसेच वाहतूक शाखेतील ७०० पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

LS Election Result: लोकसभेचा रणसंग्राम कोण जिंकणार? प्रतीक्षा संपली, लोकसभेच्या ५४३ जागांच्या निकालाचे काउंटडाउन सुरू

या बाबत पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, शहरातील विविध पक्षांची कार्यालये, उमेदवारांचे निवासस्थान, कार्यालय परिसरात बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये त्या दृष्टीने सर्व तयारी करण्यात आली आहे.

ग्रामीण भागात देखील चोख बंदोबस्त

शिरूर लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी रांजणगाव येथे होणार असून येथे देखील चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या ठिकाणी दोन अतिरिक्त पोलीस अधीक्षक, ९ उपविभागीय अधिकारी, ३८ पोलीस निरीक्षक, १७९ पोलीस उपनिरीक्षक, २८०० पोलीस कर्मचारी, शीघ्र कृती दलाची आठ पथके, राज्य राखीव पोलीस दलाची एक तुकडी, गृहरक्षक दलाचे ५०० जवान बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आल्याची माहिती पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिली.

टी-२० वर्ल्डकप २०२४

विभाग