Thane Murder : ठाण्यातील कोलशेत येथे एका इमारतीवर एकाची हत्या करून त्याचे मुंडके छतावर ठेवण्यात आले होते. या घटनेमुळे खळबळ उडाली होती. या हत्तेचा छडा काही तासांतच पोलिसांनी लावला आहे. सिक्युरिटी सुपरवायजरची हत्या करण्यात आली असून हे कांड सुरक्षा रक्षकाने केल्याचं पुढं आलं आहे. सुपरवायजरने आईवरून शिवीगाळ केल्याने आरोपीने क्राइम वेब सिरिज पाहून ही हत्या केल्याचं उघड झालं आहे.
सोमनाथ सदगिरे (वय ३५) असे हत्या झालेल्या सिक्युरिटी सुपरवायजरचे नाव आहे. तर प्रशांत कदम असे आरोपी सुरक्षा रक्षकाचे नाव आहे. सोमनाथची हत्या केल्यावर प्रशांतने सोमनाथच्या मृतदेहाचं मुंडकं छाटलं व ते छतावर ठेवले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कोलशेत येथे एक शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या इमारतीच्या छतावर सफाई कर्मचारी गेले होते. यावेळी त्यांना सिक्युरिटी सुपरवायझर सोमनाथ सातगीरे यांचा मृतदेह व धडापासून वेगळे केले मुंडके आढळून आले होते. त्यांच्या डोक्यावर, चेहऱ्यावर, मानेवर व पाठीवर गंभीर वार करण्यात आले होते. या घटनेमुळे खळबळ उडाली होती. या हत्येप्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेच्या पाच पथकाद्वारे या प्रकरणाचा तपास सुरू होता.
या हत्येचा तपास करत असतांना पोलिसांनी घटनास्थळावरचे सीसीटीव्ही तपासले. आरोपी प्रसाद कदम हा ईमारतीतील लिफ्ट मधून सोमनाथ सोबत जात होता. मात्र, खाली परत येत येत असतांना तो एकटाच होता. त्यामुळे त्याच्यावर संशय बळावला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत त्याची चौकशी केली. यावेळी त्याने खून केल्याची कबुली दिली.
सोमनाथ याने प्रसादला त्याच्या आईवरुन शिवीगाळ केली होती. दोघामध्ये काही कारणावरून यापूर्वीही वाद झाले होते. सोमनाथने शिवीगाळ केल्याने प्रसादला राग आला होता. यामुळे त्याने क्राईम सीरिज पाहून कशी हत्या केली जाते याचा अभ्यास केला. तसेच हत्यार देखील त्यांन आणलं. यानंतर सोमनाथने प्रशांत कामावर असताना त्याची हत्या केली. दरम्यान, प्रसाद याचे मानसिक संतुलन ठीक नसल्याच तपासात पुढं आलं आहे.